मनमाड ते परभणी पर्यंत रेल्वे दुहेरीकरण लवकर फंड उपलब्ध करून सुरू करण्याची मागणी- डॉ. शिवाजी शिंदे
श्रेयश वानखेडे: सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील रहिवासी असलेले डॉ शिवाजी रामभाऊ शिंदे यांची रेल्वे बोर्ड सदस्य पदी निवड झाली असून त्यांना उत्तर मध्य रेल्वे बोर्ड सदस्य पदी निवड झाल्यानंतर दि.25 जून रोजी प्रयागराज येथे कान्हा शाम फाइव स्टार हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मीटिंग मध्ये मराठवाड्यातील अनेक महत्वाच्या समस्या मांडताना त्यांनी मनमाड ते परभणी रेल्वे दुहेरीकरणाची जोरदार मागणी केली असून त्यांनी या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून मनमाड ते रोटेगाव पर्यंत काम प्रगतीपथावर सुरू आहे. शासनाने याच प्रकल्पाला परभणी पर्यंत पुढे चालू करण्यासाठी नुकतीच मंजुरी दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे.ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन हे काम दोन वर्षात पूर्ण करावे अशी मागणी केली आहे.त्याच बरोबर जेष्ठ नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी पूर्वी कोरोना काळाच्या अगोदर योजना सुरू केल्या होत्या त्या कोरोना काळामध्ये बंद करण्यात आल्या होत्या त्या पूर्ववत सुरू करून जेष्ठ नागरिकांना आरक्षण, तिकिटा मध्ये 50% सवलत देऊन सन्मान करावा.अमृत योजने अंतर्गत मराठवाड्यातील सर्व रेल्वे स्टेशन चा विकास लवकर पूर्ण करावा.त्यासाठी निधीची कमतरता भासू देऊ नये.सेलू स्टेशन वर पूर्वी म्हणजे कोरोना काळाच्या अगोदर ज्या रेल्वे गाड्याना थांबा होता तो पूर्ववत सुरू करावा. विशाखापट्टणम व नगरसोल गाड्यांना सेलू स्टेशन वर थांबा देऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी.काही रेल्वे स्टेशन वर तृतीयपंथींचा अनेक यात्री,प्रवाश्यांना त्रास होत आहे तो तात्काळ दूर करून प्रवाश्यांना दिलासा द्यावा अश्या अनेक गोष्टी निर्भीडपणे मांडल्या आहेत.रेल्वे बोर्ड चे प्रमुख मा. जोशी साहेब यांनी या मागण्यांचे स्वागत करून त्याची रितसर पूर्तता करण्यासाठी लेखी स्वरूपात लेटर पॅड लिहून देण्यात यावी म्हणजे आम्ही त्याची नोंद घेऊन त्या डिव्हिजन मध्ये पाठवून त्याची पूर्तता करण्याची हमी दिली. यावेळी संपुर्ण क्षेत्रीय रेल्वे बोर्ड सदस्य उपस्थित होते.तीन सांसद आमदार आणि पूर्ण रेल्वे प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.