Friday, May 1, 2026
HomeChandrapurचंद्रपूर जिल्हा जल व वायू प्रदुषणामुळे धोकाः राजेश वारलुजी बेले
spot_img

चंद्रपूर जिल्हा जल व वायू प्रदुषणामुळे धोकाः राजेश वारलुजी बेले

चंद्रपूर जिल्हा जल व वायू प्रदुषणामुळे धोकाः राजेश वारलुजी बेले

श्रेयश वानखेडे:

चंद्रपूर जिल्हयातील वाढत्या वायु व जल प्रदुषणामुळे मानवी जीव, वन्य व पाळीव प्राणी, जलचर व पक्ष्याच्या जिवाला निर्माण झालेल्या धोक्याबाबत चौकशी व कारवाई करण्याबाबत तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री पंकजा  मुंडे, चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री अशोक उईके, आमदार ब्रम्हपूरी विजय वडेट्टीवार, आमदार बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, आमदार चंद्रपूर किशोर जोरगेवार, वर्ली विधानसभा आदित्य ठाकरे, शिक्षक मतदार संघ नागपूर आमदार सुधाकर अडबाले यांना राजेश वारलुजी बेले, संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था, चंद्रपूर यांनी निवेदन दिले आहे.

चंद्रपूर जिल्हयातील विविध औद्योगिक आणि नागरी भागामध्ये वाढत असलेल्या वायू व जल प्रदूषणामुळे मानवी आरोग्य व पर्यावरण गंभीर संकटात सापडलेले आहे. या प्रदूषणाचा गंभीर परिणाम फक्त मानवावर नव्हे तर वन्य जीव, पाळीव प्राणी, जलचर व पक्ष्यांवरही झाला असून जिल्हयातील अनेक भागामध्ये नागरीकांना श्वसनाचे व त्वचेचे विकार, डोळयाची जळजळ, सततचा खोकला यासारख्या समस्या भेडसावत आहे.

चंद्रपूर तालुक्यातील भटाळी, प‌द्मापूर, दुर्गापूर, चांदा रयतवारी, लालपेठ वेस्टर्न कोल फिल्ड लि., कोळसा खाण व चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्र, में. धारीवा विद्युत केंद्र ताडाळी, में, गोपानी लोह व पॉवर प्रा. लि. ताडाळी, में. ओमाटा वेस्ट लि., ताडाळी, में. ग्रेस इंडस्ट्रीज अॅड पॉवर लि. ताडाळी, में. चमन मेटल लि. ताडाळी व लॉयड्स मेटल अँड एनर्जी लि. घुग्घुस, में. ए.सी.सी. सिमेंट घुग्घुस, २४ कोल डेपो, मे. विमला रेल्वे साईडींग, में. मल्टी ऑरगॅनीक प्रा. लि., चंद्रपूर एम.आय.डी.सी., स्टील ऑथोरिटी इंडिया लि. चंद्रपूर, में, फेरो ऑईल प्लॉन्ट, में. महाराष्ट्र कार्बन, में. के. के. एन्टरप्रायजेस कोळसा पावडर प्रक्रिया, मे. हिंदुस्थान स्काव, में. यंग कंन्स्टक्शन कंपनी हॅट मिक्स प्लॉन्ट, मे. अभिजित केमिकल्स, में. भाटीया कोल वाशरी, में वेस्टर्न कोलफिल्ड लि. ऊर्जानगर , गडचांदूर माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा, दालमिया, चुनखडी खदान, लोह खनिज प्रकल्प मुल, कोल वासरी, गिट्टीघदान, गिट्टी क्रेशर, हॉट मिक्स प्लांट, चंदपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सकाळी घाण कचरा जाळणे, भंगार व अॅटोमोबाईल व्यावसायीक वायर व टायर जाळत असते त्यामुळे चंद्रपुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वायू व जल प्रदुषण निर्माण होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण झालेला आहे असा अहवाल जिल्हा परिषद, शासकीय रूग्णालय, चंद्रपूर व कर्मवीर मां.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय, चंद्रपूर यांनी खालीलप्रमाणे अहवाल सादर केलेला आहे. चंद्रपूर जिल्हा व तालुका जलप्रदुषण, वायू प्रदुषण व दुषित पाणी पुरवठामुळे होणारे आजार.

वायु व जल प्रदुषण अहवाल एप्रिल २०२३ मार्च २०२४ ते २०२५

हवा प्रदुषण आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे श्वसन विकार जलप्रदुषण, जलजन्य आजार अस्थमा-११,५६८, हृदयविकार-७,०८३, जलजन्य आजार कॉलराव अतिसार-१८,७०८,

डेग्यु मलेरिया-३,१५१, शोषण संबंधीत आजार-५,७११, मानसिक आजार-१,९०२ कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय महाविद्यालय, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, चंद्रपूर१ जानेवारी, २०२३ ते दिनांक १६ मे, २०२५ रोजी पर्यंत

फुस्फुसाचे क्षयरोग-८२१, त्वचा रोग-७७,५४३,

गर्भवती महिलांचे आजार जानेवारी ते डिसेंबर, २०२३-१२५४

जानेवारी ते डिसेंबर, २०२४- १५६०

जानेवारी ते २५ जुन, २०२५-७७४

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव हे कार्यरत झाले असल्यापासुन चंद्रपूर जिल्हयातील औद्योगिक व महानगर क्षेत्रामध्ये खुप मोठ्या प्रमाणात घातक वायु व जल प्रदुषण वाढले असल्यामुळे अशा निष्काळजी प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव यांच्यावर उच्च स्तरीय चौकशी करून कायदेशिर कार्यवाही करणे काळाजी गरज आहे.

चंद्रपुर शहर, महानगरपालिका चंद्रपूर राष्ट्रीय स्वच्छ वायु समिती अध्यक्ष, आयुक्त विपीन पालीवाल यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत खुप मोठ्या प्रमाणात घातक वायु प्रदुषण वाढविण्यात योगदान दिलेले आहे. यांच्या कार्यकाळात चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सकाळच्या सुमारास घाण कचरा जाळणे, स्कॉब व ऑटोमोबाईल व्यवसायीक, कॉपर वायर, टायर इत्यादी जाळून घातक वायु प्रदुषण शहरामध्ये होत असल्याने मनपा आयुक्त, विपीन पालीवाल यांच्यावर योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

चंद्रपूर जिल्हाधिकारी व जिल्हा पर्यावरण समितीचे अध्यक्ष, श्री. विनय गौडा साहेब यांनी म.प्र.नि.मंडळ, श्री. तानाजी यादव यांना प्रदुषणाबाबत वारंवार कारणे दाखवा नोटीस दिले असुन सुध्दा प्रादेशिक अधिकारी यांनी प्रदुषणाबाबत गांभीर्याने दखल न घेता पदाचा दुरूपयोग केलेला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई, सदस्य सचिव, श्री. अश्वीन ढाकने साहेब व हवा प्रदुषण नियंत्रण अभियंता, श्री. रविद्रजी आंधळे साहेब यांना वारंवार चंद्रपूर जिल्हयातील वाढते घातक वायु व जल प्रदुषणबाबत माहिती व तकार देऊन सुध्दा जिल्हयातील मानवी जीव, वन्य प्राणी, पाळीव प्राणी, जल प्राणी व पशु-पक्षी यांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण करण्यासारखे काम या अधिका-यांनी केलेले आहे म्हणून या अधिका-यांवर मनुष्यवधाचा फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

चंद्रपूर जिल्हयामध्ये औद्योगिक, घातक रासायनिक द्रव्य मिश्रीत नागरिकांना पिण्याचा पाणी पुरवठा, जड वाहतूक, शासकीय घाण कचरा, मोटार वाहन व अर्धश्रध्दामुळे घरगुती कपडे, घाण कचरा व चुल जाळणे अशा प्रकारचे खुप मोठ्या प्रमाणात घातक वायू व जल प्रदूषण निर्माण शेत असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रदुषणाच्या विनाशकारी घटकामुळे विनाशाच्या दिशेने जात असल्यामुळे शासनानी व जनतेनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदुषण कमी करण्याकरीता ठोस उपाययो। ता करण्याची काळाची गरज आहे. मागण्या पुर्ण न झाल्यास तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा राजेश वारलुजी बेले, संस्थापक अध्यक्ष, संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी दिलेला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page