Tuesday, July 28, 2026
HomeParbhaniमुलींच्या विवाह मध्ये अवास्तव खर्च करण्यापेक्षा तोच पैसा तिच्या शिक्षणावर खर्च करावा-...
spot_img

मुलींच्या विवाह मध्ये अवास्तव खर्च करण्यापेक्षा तोच पैसा तिच्या शिक्षणावर खर्च करावा- प्रख्यात व्याख्याते शेख सुभान अली.

मुलींच्या विवाह मध्ये अवास्तव खर्च करण्यापेक्षा तोच पैसा तिच्या शिक्षणावर खर्च करावा- प्रख्यात व्याख्याते शेख सुभान अली.

श्रेयश वानखेडे:

मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे‌. हि समाधानाची बाब असली तरी मुलींना गुणवत्तापूर्ण उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. मुलींच्या लग्नात तिला भेट वस्तू देण्यासाठी व जेवणावळी वर अवास्तव खर्च करण्यात येतो, सदरील खर्चाला फाटा देऊन तिचे लग्न इस्लाम मध्ये सांगितलेल्या साध्य पध्दतीने करावे. तिच्या लग्नात खर्च करण्यापेक्षा तोच खर्च तिच्या शिक्षणावर करावा असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते, मराठी मुस्लिम चळवळीचे संस्थापक अध्यक्ष, दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानचे संयोजक शेख सुभान अली यांनी मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रम समारंभात केले.अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलू तर्फे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान व इस्लामीक क्विझ काॅंन्टेस्ट स्पर्धा तसेच दहावी, बारावी, नीट, सिईटि, शिष्यवृत्ती व इतर परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 29 जुन रोजी साई नाट्यगृह महेश नगर सेलू येथे प्रसिद्ध विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेख सुभान अली हे प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट शेख अरशद, ऑल इंडिया आयडल टिचर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख अब्दुल रहिम, मौलाना वहाब नदवी हे उपस्थित होते‌.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलू चे अध्यक्ष इंजिनिअर अनीस कुरेशी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय घौरी जावेद यांनी करुन दिला. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे खान अब्दुल गफार खान उर्दु हायस्कूल पाथरीची विद्यार्थिनींनी शेख लबिना शेख मजीद हिने अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलू तर्फे घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान व इस्लामीक क्विझ काॅंन्टेस्ट स्पर्धेत पटकावलेले पहिले बक्षिस 7000/ रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चा साठी अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलू कडे सुपूर्द केले. श्रोते व प्रेक्षक यांनी गच्च भरलेल्या साई नाट्य गृहात पुरुषांसोबत जवळपास ४०० महिला भगिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी सेलूचे सदस्य व सातोना येथे कार्यरत शिक्षक शेख इमामोद्दिन निजामी हेनियत वयोमानानुसार दिनांक 30 जुन रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सचिव शफीक अली खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मौजम सर व बागवान हारुण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनिअर पठाण रशिद खान यांनी केले. राष्ट्र गिताने कार्यक्रमा ची सांगता करण्यात आली. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शेख शमशोद्दिन, हाजी पठाण निसार, हाजी शेख रफीक, घौरी जावेद, इमरान कुरैशी, शेख असगर, जकी अहेमद सिद्दिकि अदिंनी परिश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page