Monday, September 21, 2026
spot_img
HomeEducationशाळा संस्था किती मोठी असो तरी त्यांना कायद्याचे पालन करावे लागते

शाळा संस्था किती मोठी असो तरी त्यांना कायद्याचे पालन करावे लागते

शाळा संस्था किती मोठी असो तरी त्यांना कायद्याचे पालन करावे लागते

श्रेयश वानखेडे:

शाळा  संस्था कितीही मोठी असली तरी त्यांना कायद्याचे पालन करावेच लागते. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुट्टी जाहीर असतानाही तथा शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्याचे पत्र असतानाही त्यांनी त्याचे पालन केले नाही, त्यामुळे हा शासनाचा अवमान समजण्यात आला.
महाराष्ट्रात सीबीएससी, आयसीएसई, किंवा विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, सेल्फ फायनान्स स्कूल जरी कोणी चालवत असल्यास त्याला सुद्धा एम इ पी एस 1977 व 1981 या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे.
शिक्षकांना पूर्ण वेतन, त्यांचे रजा नियम, त्यांच्या कामाचे तास, त्यांची वेतन वाढ तथा शासनाने निर्गमित केलेल्या कायद्यानुसार त्यांना पीएफ व ग्रॅच्युईटी चा लाभ देणे बंधनकारक आहे. हे होत नसल्यास आपण संबंधित जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी यांना तक्रार करावी. शिक्षक, विद्यार्थ्यांचे शोषण करणाऱ्या विरुद्ध कारवाई नक्की होईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद श्री. विवेक आंबेकर चंद्रपूर यांनी दिली असून संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page