सिस्वाचे सीबीएससीई शाळेतील सुट्ट्या, दादाजी भुसे यांना निवेदन !
श्रेयश वानखेडे: दिवसेंदिवस सीबीएसई शाळांचे वाढते जाळे पाहता प्रत्येक शहरांमध्ये, गावामध्ये गल्लो गल्ली वाढत जाणाऱ्या सीबीएसई शाळा आज एक कुतूहलाचाच विषय बनत चालला आहे. अतिशय महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हय़ात नवीन सीबीएसई शाळा कोणाला जर सुरू करायची असेल तर त्यासाठी त्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) कडून कोणालाही ॲफिलिएशन मिळू शकत नाही.
दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी डेप्युटी सेक्रेटरी ॲफिलिएशन (सीबीएसई) यांच्या स्वाक्षरीचे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे गव्हर्मेंट ऑफ इंडिया तसेच तत्सम राज्य शिक्षण विभागाचे सर्व नियम त्या राज्यात असणाऱ्या सर्वच प्रकारच्या शाळांना लागू आहेत. तसेच सीबीएसई बायलॉज मध्ये नमूद केलेल्या नियमानुसार शाळा ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे नियुक्ती पासून तर निवृत्ती पर्यंतचे सगळे नियम सीबीएसई शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना लागू पडतात. तसेच सीबीएसई बायलॉज च्या एका नियमानुसार जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमध्ये जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार दिलेला आहे. सीबीएसई बायलॉज मध्ये नमूद केलेल्या नियमानुसार महत्त्वाचे सर्व अधिकार जिल्ह्यातील शिक्षण विभागाला सीबीएसई दिलेले आहे तसेच 3 सप्टेंबर 2020 रोजी पीएमओ ऑफिस, दिल्ली तर्फे सिस्वाला प्राप्त झालेल्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांबाबत चालू सत्राच्या शैक्षणिक वर्षातील दीर्घ सुट्ट्या मुख्याध्यापक व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांची सभा आयोजित करून निर्धारित केल्या जातात. शिक्षणाधिकारी आदेशानुसार चालू शैक्षणिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या आहेत याप्रमाणे सुट्ट्या देणे अनिवार्य आहे असे असतांनाही या सर्व सीबीएसई शाळा मनमानी करून स्वतःच्या इच्छेनुसार व मर्जीनुसार शाळेला सुट्टी जाहीर न करता उलट त्या दिवशी शाळा झाल्यानंतर शिक्षकांसाठी मीटिंग किंवा कार्यशाळा इत्यादी ठेवून सर्व शिक्षकांचा व कर्मचारीवर्गांचा मानसिक छळ करून त्यांचे शोषण करतात.
सीबीएसई शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायिक अधिकारासाठी लढणाऱ्या सीबीएसई स्कूल स्टाफ वेल्फेअर असोसिएशन (सिस्वा) ने शैक्षणिक वर्ष 2023, 2024 तसेच 2025 मध्ये जाहीर झालेल्या विविध सुट्ट्यांसाठी संघटनेने अथक प्रयत्न करून जिल्ह्यातील सीबीएसई शाळेनी जाहीर न केलेल्या सुट्ट्या देण्याबद्दल भाग पडलेले आहे. तसेच शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन होण्याकरता संघटनेने वरील मुद्द्याची अतिशय गंभीरतेने दखल घेऊन शिक्षण विभागाने निर्धारित केलेल्या सुट्ट्यांबाबतचे सगळेच नियम जिल्ह्यातील प्रत्येक सीबीएसई शाळे तर्फे कुठल्याही प्रकारची स्वताची मनमानी न करता तंतोतंत पाळले जावे म्हणून तशा प्रकारचं निवेदन सिस्वातर्फे दिनांक ८ जुलै २०२५ ला ना. दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री ,सचिंद्र प्रतापसिंग, शिक्षण आयुक्त,आ.संदीप जोशी, यांना पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेख या आयुधांचा उपयोग करावा तसेच सीबीएसई संचालकांना दिलेले आहे.यात चंद्रपूर येथील शाळेने १० जुन, वटपौर्णिमा, जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या सुट्ट्या नदिल्याची तक्रारीची नोंद घ्यावी असे नमूद केले आहे.
[ फोटो :-खाजगी शाळा शिक्षक संघाचे शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेंद्र पातळे यांना निवेदन ]