चिमूर घरफोडीच्या गुन्ह्यात बादशाह आणि बडा कोब्रा जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
श्रेयश वानखेडे:- चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रगती नगर येथे घडलेला घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासाचे आंत उघड करून दोन आरोपींना अटक करीत चोरीतील ३८ तोळे सोन्याचे दागीने जप्त केले. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे रा. गौतम नगर भद्रावती, गोपाल उर्फ बडा कोब्रा जिवन मालकर (२५ )रा.श्याम नगर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.
दिनांक ११ जुलै रोजी फिर्यादी सौ. कल्पना मुर्लीधर गोननाडे (४६) रा. प्रगती नगर चिमूर यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली होती की, दि.०६ जुलै रोजी दुपारी १:३० वाजता घराचे दरवाजाला कुलूप लावुन बाहेर गावी जावुन दि. ११ जुलै रोजी सायंकाळी ६:०० वाजता परत आले असता त्यांचे घरातील हॉलचा दरवाज्याचा लॉक तोडुन उघडा दिसल्याने आंत जावुन पाहिले असता त्यांचे बेडरुम मधील दागीने ठेवलेले टेबलचा ड्रावर मधील सोन्याची चपळाकंटी, सोन्याची पोत, सोन्याच्या बांगडया, सोन्याचा गोप, सोन्याचे कानातले तीन जोड, सोन्याचे कानातील रिंग, सोन्याच्या आंगठया, सोन्याची नथ, सोन्याची गरसुळी व इतर दागीने असा एकुण ३८ तोळे ६०० ग्राम वजनाचे सोन्याचे दागीने एकुण किंमत ८ लाख ४९ हजार २०० रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे तक्रारीवरुन पोस्टे चिमुर येथे अज्ञात चोरटयांविरुध्द अपराध क्रमांक २५६/२०२५ कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हयाचे गांभीर्य पाहता स्थानिक गुन्हे शाखेतील वेगवेगळी शोध पथके गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध कामी रवाना करण्यात आले असता गुन्हयाचा तंत्रबध्द व सखोल तपास करुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे रा. गौतम नगर भद्रावती, गोपाल उर्फ बडा कोब्रा जिवन मालकर वय २५ वर्ष रा.श्याम नगर चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली देवुन चोरलेले संपुर्ण सोन्याचे दागीने एकुण वजन अंदाजे ३८ तोळे हस्तगत करण्यात आले असुन आरोपी चिमुर पोलीसांचे ताब्यात देण्यात येत असुन पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कॉक्रेडवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, सफौ धनराज करकाडे, पोहवा नितीन रायपुरे, संतोष येलपुलवार,जय सिंह, गणेश मोहुर्ले, नितीन कुरेकार, नितीन साळवे, चेतन गज्जलवार, सचिन गुरनुले, सुरेद्र महंतो, रजनीकांत पुट्टावार, सुभाष गौरकार, सतिश अवथरे, इमरान खान, दिपक डोंगरे, प्रमोद कोटनाके, अजय बागेसर, किशोर वैरागडे, पोअं मिलींद जांभुळे, अजित शेन्डे, प्रसाद धुळगुंडे, प्रफुल्ल गारघाटे, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, गणेश भोयर, गोपिनाथ नरोटे, शेखर माथनकर, चापोहवा दिनेश अराडे, चापोहवा ऋषभ बारसिंगे, चापोअं मिलीट टेकाम, मपोअं अर्पणा मानकर आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर टिम यांनी केली आहे.