Thursday, June 4, 2026
HomePoliceसराईत गुन्हेगार शूटर चा रामनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या, घरफोडीचा गुन्हा उघड
spot_img

सराईत गुन्हेगार शूटर चा रामनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या, घरफोडीचा गुन्हा उघड

सराईत गुन्हेगार शूटर चा रामनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या, घरफोडीचा गुन्हा उघड

सोन्या-चांदीचे दागीने किंमत १,५४,०००/- रुपयाचा माल हस्तगत

श्रेयश वानखेडे  :- इंडस्ट्रिअल एरिया बंगाली कॅम्प येथे झालेल्या चोरीचा गुन्हा रामनगर पोलीसांनी उघड केले रेकॉर्ड वरील गुन्हेगार आरोपी मो. सरफोराज सागीर शहा उर्फ शुटर वय २४ वर्ष रा. आमटे ले-आऊट रयतवारी कॉलरी चंद्रपूर याला ताब्यात घेतले आहे.
       १३ जुलै रोजी रात्रौ दरम्यान पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे शोध पथक पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन रयतवारी कॉलरी परिसरात रेकॉर्ड वरील गुन्हेगार मो. सरफोराज सागीर शहा उर्फ शुटर वय २४ वर्ष रा. आमटे ले-आऊट रयतवारी कॉलरी चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने पोलीस स्टेशन रामनगर येथील दि.७/७/२०२५ ते ९/७/२०२५ दरम्यान सौ मनीषा मोरेश्वर झिले रा. आनंद बुध्द विहार जवळ इंडस्ट्रिअल एरिया बंगाली कॅम्प चंद्रपूर यांचा घरी झालेल्या चोरीचा अपराध क्रमांक ५२७/२०२५ कलम ३३१ (१), ३३१ (४), ३०५ भारतीय न्याय संहिता हा घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे कब्ज्यातून सदर गुन्हयातील चोरलेले सोन्या-चांदीचे दागीने किंमत १ लाख ५४ हजार रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोअं. शरद कुडे, आनंद खरात, लालु यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेन्द्रे, जितेंद्र आकरे, बाबा नैताम, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, सुरेश कोरेवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page