श्रेयश वानखेडे: जनता विद्यालय ताडाळी येथे विद्यार्थी -शिक्षक- पालक सभा संपन्न झाली. नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. कार्यकारणीचे अध्यक्ष श्री. बी.जी.जीवतोडे सर, उपाध्यक्ष श्री बाबुराव जाधव, सचिव श्रीमती ए. व्ही. पिदूरकर मॅडम,सहसचिव सौ. शितल प्रदीप लांजेकर , विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सार्थक जूनघरे,कु.कांचन विकास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. ताडाळी एमआयडीसी अंतर्गत येणारी धारिवाल कंपनी यांचेकडून आरो फिल्टर मिळाल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेल्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला विद्यार्थी- पालक -शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.