Friday, June 5, 2026
HomeEducationसर्व सीबीएसई शाळांना नागपंचमीची सुट्टी बंधनकारक
spot_img

सर्व सीबीएसई शाळांना नागपंचमीची सुट्टी बंधनकारक

सर्व सीबीएसई शाळांना नागपंचमीची सुट्टी बंधनकारक

सिस्वा संघटनेच्या प्रयत्नांना मोठे यश

श्रेयश वानखेडे:

सीबीएसई शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्यायिक अधिकारासाठी लढणाऱ्या सीबीएसई स्कूल स्टाफ वेल्फेअर असोसिएशन (सिस्वा) ने 29 जुलै 2025 ला येणाऱ्या नागपंचमी सणानिमित्त नागपुरातील सगळ्या सीबीएसई शाळेने सुट्टी जाहीर करण्याकरता सिस्वा च्या अध्यक्ष श्रीमती दिपाली महेश डबली  यांनी तातडीने तशा प्रकारचे पत्र 25 जुलै 2925 ला माननीय जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती रोहिणी कुंभार यांना  देऊन 29 जुलैला नागपंचमीनिमित्त सर्व सीबीएसई शाळेने सुट्टी जाहीर  करण्याबाबतची मागणी केलेली होती.

सिस्वाची ही न्यायिक व महत्वपूर्ण मागणी तातडीने मान्य करून माननीय शिक्षणाधिकारी श्रीमती रोहिणी कुंभार यांनी दिनांक 24 जुलै 2025  रोजी सिस्वा तर्फे देण्यात आलेल्या मागणी पत्राचा संदर्भ घेऊन  सर्व प्रकारच्या माध्यमांच्या/ सर्व प्रकारच्या मंडळाच्या/ तसेच सर्व व्यवस्थापनाच्या/ माध्यमिक शाळांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या नावे परिपत्रक काढून दिनांक 29 जुलै 2025 रोजी नागपुरातील सर्वच सीबीएसई शाळेला नागपंचमी चि अनिवार्य सुट्टी घोषित करण्याबाबत निर्देशित केलेले आहे.

तसेच  जिल्हा परिषद नागपूर कार्यालयाचे वार्षिक सुट्ट्या बाबतच्या परिपत्रक दिनांक 14/2/25 चे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबद्दल निर्देश दिलेले आहे.

तसेच चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, अकोला, अमरावती ईत्यादी जिल्ह्य़ातील सर्व सीबीएसई शाळांनि सुद्धा नागपंचमी सणानिमित् सुट्टी जाहीर करण्याकरता तसेच सबंधित शिक्षण विभागाने निर्देशित केलेल्या वार्षिक सुट्टय़ाचे सर्व सीबीएसई शाळे तर्फे काटेकोर पालन अनिवार्य असण्या बाबत चे  निर्देश देण्याबद्दल सिस्वा च्या अध्यक्ष श्रीमती दिपाली महेश डबली  यांनी तशा प्रकारचे पत्र 25 जुलै 2025 ला माननीय उपविभागीय संचालक श्रीमती माधुरी सावरकर नागपूर यांना देऊन  सिस्वातर्फे विनंती करण्यात आलेली आहे.

सिस्वाच्या पहिल्या जनआंदोलनाचे फलित म्हणून  12 फेब्रुवारी 2020 रोजी डेप्युटी सेक्रेटरी अॅफिलिएशन (सीबीएसई) यांच्या स्वाक्षरीचे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे गव्हर्मेंट ऑफ इंडिया तसेच तत्सम राज्य शिक्षण विभागाचे सर्व नियम त्या राज्यात असणाऱ्या सर्वच प्रकारच्या शाळांना लागू आहेत.

तसेच सीबीएसई बायलॉज च्या एका नियमानुसार जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील सीबीएसई शाळांमध्ये जाऊन इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या सीबीएसई बायलॉज मध्ये नमूद केलेल्या नियमानुसार महत्त्वाचे सर्व अधिकार जिल्ह्यातील शिक्षण विभागाला सीबीएसई ने देऊ केलेले आहे.

तसेच 3 सप्टेंबर 2020 रोजी पीएमओ ऑफिस, दिल्ली तर्फे सिस्वाला प्राप्त झालेल्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे की सीबीएसई शाळेतल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सगळ्या तक्रारी तेथील स्टेट तसेच डिस्ट्रिक्ट एज्युकेशन डिपार्टमेंट कडे नमुद करता येईल.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page