साईबाबा नागरी सहकारी बँकेला 1 कोटी 92 लाखांचा नफा.
10 टक्के लाभांश जाहीर : बँकेची 30 वी वार्षिक सभा संपन्न.
श्रेयश वानखेडे : दि.26 रोजी सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार 26 जुलै रोजी उत्साहात पार पडली. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय येथे सकाळी 11 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली होती. बँकेच्या आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेण्यासोबतच, यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेला झालेल्या नफ्यावर सभासदांनी समाधान व्यक्त करत 10 टक्के लाभांशाला मंजुरी दिली.बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत आडळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला सभासदांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. सभेची सुरुवात साईबाबा मूर्ती पूजनाने करण्यात आली. या वेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, राम नाना खराबे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डिव्ही मुळे, मधुकर नाना पौळ, एकनाथ पौळ, हाजी शफीक अली खान, पुजाराम निर्वळ, तसेच संचालक बालचंदानी कन्हैयालाल, बिनायके प्रवीणचंद, ओम तोषनिवाल, शेख इम्रान, गगाधर आडळकर, कांचन प्रताप, माणियार सुरेंद्र, संजय मगर, मोगल भाऊसाहेब, ए. टी. गजमल आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक व सभेच्या विषयांचे विवेचन बँकेचे मुख्याधिकारी रामराव लाड यांनी केले, तर वार्षिक अहवालाचे वाचन सुभाष चव्हाण यांनी केले. यावेळी अॅड. गोविंद शेळके, डॉ. शरद कुलकर्णी, एकनाथ पौळ, हाजी शफीक अली खान, तांगडे महाराज आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हाजी शफीक अली खान व पुजाराम टेलर यांचा सन्मान शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षात बँकेने 1 कोटी 92 लाख 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला असून, त्यातून कायदेशीर तरतुदीनंतर 10 टक्के लाभांश वितरित करण्याचा निर्णय सभेमध्ये एकमताने घेण्यात आला. मार्च 2025 अखेर वसूल भाग भांडवल 6 कोटी 72 लाख रुपये, स्वनिधी 26 कोटी, एकूण ठेवी 236 कोटी 52 लाख रुपये, तर कर्जवाटप 127 कोटी रुपये इतके आहे. नेट एनपीए 7.49% आणि ग्रॉस एनपीए 9.533% असून बँकेच्या सर्व शाखा नफ्यात आहेत. बँकेचे एकूण सभासद 9,454 आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लिपिक सौ. पूजा काला यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक दत्ता पौळ, संतोष हुगे, पठाण निसार, अविनाश आडळकर, शेख अबूजर, गुलाब सोनवणे, सुरेश आठे, आनंद मोरे, कैलास गव्हाणे, किशोर विटेकर, भास्कर आडळकर, नितीन आडळकर, उमेश खरावणे, अजय मरळी, संतोष जायभाय, गोकुळ पारखे आदी कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.दरम्यान, सभासद व ग्राहकांनी आधुनिक बँकिंग सेवा जसे की एटीएम, पीओएस, ई-कॉमर्स, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड यांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी यावेळी केले.
पुरस्कारांची परंपरा कायम…..
बँकेला मागील दहा वर्षांपासून सलग 10 टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवता आली आहे. या कालावधीत बँकेने ‘पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार’, ‘बेस्ट चेअरमन’, ‘बेस्ट डायरेक्टर’, ‘बेस्ट सीईओ’ असे अनेक सन्मान प्राप्त केले आहेत.