Wednesday, July 29, 2026
spot_img
Homeबल्लारपूरवंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रयत्नांना यश

वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रयत्नांना यश

वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रयत्नांना यश

अखेर रेल्वे गोलपुलियाच्या तात्पुरत्या दुरुस्ती चे काम सुरू 

Jyotsna Wankhede
बल्लारपूर वंचित बहुजन महिला आघाडीने मान. तहसीलदार यांना दिनांक 21 ऑगस्ट 2025 ला निवेदन दिले होते. निवेदनात मागणी करण्यात आली होती की रेल्वे गोल पुलिया खालील रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे हा रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता मान. तहसीलदार महोदय यांनी रेल्वे विभाग तसेच नगर प्रशासनाचे  अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या रस्त्याची कायम दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याचाच परिणाम असा झाला की नगर प्रशासने विषयाचे गांभीर्य ओळखून व नवरात्र उत्सव लक्षात घेता तात्पुरत्या दुरुस्तीचा मार्ग स्वीकारलेला असून दिनांक 15 पासून ते 21 सप्टेंबर पर्यंत मार्ग जड वाहनांकरीता बंद करून त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केलेले आहे या सर्व कामांसाठीचा प्रयत्न व पाठपुरावा वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्षा रेखाताई पागडे यांनी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात केला व अखेर गोल पुलियाखालील कामाला सुरुवात झाली शहरातील नागरिकांना या दुरुस्तीमुळे होणारा त्रास थोडा कमी होणार आहे. परंतु पूर्ण काम झालेले नाही कारण पुलाखालील दुरुस्ती करिता रेल्वे विभागाची परवानगी लागते ती अद्याप मिळालेली नाही. त्याकरिता वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरद्वारे लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार आहे अशी माहिती एका पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गौतम रामटेके यांनी दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page