Monday, September 14, 2026
spot_img
HomeSanghtanaचंद्रपूर जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर ग्रामीण व शहर...

चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर ग्रामीण व शहर जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर.

चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर ग्रामीण व शहर जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर.

Jyotsna Wankhede 
सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या टीईटी (TET) संदर्भातील निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि क्षोभ लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यभरात आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. चंद्रपूर ग्रामीण व शहर जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन  देण्यात आले.
 मा.डॉ.नितीन व्यवहारे अप्पर जिल्हाधिकारी साहेब,
 यांना म.रा.शि.प.चंद्रपूरच्या वतिने निवेदन देण्यात आले.
       निवेदनात शिक्षक परिषदेच्या प्रतिनिधींच्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर १३ फेब्रुवारी २०१३ रोजी राज्य शासनाने TET संदर्भात निर्गमित केलेला शासन निर्णय अबाधित ठेवण्याची आणि शिक्षकांच्या नोकरीवरील साशंकता दूर करण्याची मागणी करण्यात आली.
   सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिक्षकांमध्ये भीती आणि निराशेचे वातावरण आहे. शासनाने घटनात्मक* व कायदेशीर भूमिका स्पष्ट करून शिक्षकांना विश्वास बहाल करावा आणि  १३ फेब्रुवारी  २०१३ चा TET  संबंधीचाच  शासन निर्णय कायम ठेवावा.
  निवेदन देण्यासाठी परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष मधुकरराव मुप्पीडवार,जिल्हा अध्यक्ष विलास खोंड, जिल्हा कार्यवाह विठ्ठल राजुरकर जिल्हा अध्यक्ष विपीन मानकर (शहर) जिल्हा कार्यवाह वसंत वडसकर जिल्हा उपाध्यक्ष देविदास चवले सर कोषाध्यक्ष सुनील पाचखेडे जिल्हा सहकार्यवाह सुशांत आक्केवार कान्व्हेंट प्रमुख विवेक आंबेकर जिल्हा कार्यवाह प्राथमिक प्रदीप रत्नावार व इतर सन्मानिय सदस्य यांची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page