प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव पदाच्या दुरुपयोग करीत असल्यामुळे करीत असल्यामुळे तत्काल निलंबनाची कारवाई करणार
Jyotsna Wankhede:
लॉयट्स मेटल अॅण्ड एनर्जी लि. एम.आय.डी.सी. घुग्घुस, ता. घुग्घुस, जि. चंद्रपूर या प्रकल्पाद्वारे घातक वायु व जल प्रदुषण होत असल्यामुळे मानवी जिवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे प्रकल्पाची पर्यावरण रद्द करा अशी मागणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी विनय गौडा, म,प, नि, मंडळ मुंबई सदस्य सचिव यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
लॉयट्स मेंटल अॅण्ड एनर्जी लि. एम.आय. डी.सी. घुग्घुस, ता. घुग्घुस, जि. चंद्रपूर या प्रकल्पाद्वारे पर्यावरण कायद्याचे पुर्णपणे उल्लघंन होत आहे.
या प्रकल्पाद्वारे निघणारे प्रदूषण प्रकल्पाद्वारे धोकादायक निघणारा कचरा, जड धातु, क्रोमियम, सिसे यासारख्या पॉरामिटर मर्यादापेक्षा जास्त आहे, या बाबी लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांनी दिनांक ०५/०६/२०२१ रोजी प्रकल्पाला CHWTSDF किंवा एम.आय.डी.सी., ताडाळी येथील प्लॉट क्रमांक सी. २० येथील प्रस्तावित घाण कचरा विल्हेवाट लावण्याकरीता आदेश दिलेले आहे. तरी सुध्दा प्रकल्पाद्वारे निघणारा घाण कचरा कोल डेपो, कोल वाशरी व इतर विद्युत केंद्रात मिश्रीत करण्याकरीता विकल्या जात आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात घातक वायू प्रदूषण निर्माण होतात.
चार कोल, डोलाचार, प्लॉय्स हाताळणी करतांना हवेमध्ये घातक सुक्ष्म कण उडत असल्यामुळे वायु प्रदुषण निर्माण होत आहे.
या प्रकल्पामध्ये फर्नेसद्वारे हवेमध्ये लोह खनिज हवेमध्ये घातक सुक्ष्म कण उड़त असल्यामुळे घातक वायु प्रदुषण निर्माण होत आहे.
याप्रकल्पाद्वारे निघणारे रासायनिक घाण कच-याची विल्हेवाट करण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावायची आहे. असे कारणे दाखवा नोटीसमध्ये सन २०२० ते २०२१ रोजीच्या या दरम्यान प्रादेशिक अधिकारी, श्री. अशोकजी करे यांनी दिलेली होती. त्या संपूर्ण कारणे दाखवा नोटीसचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रकल्पाद्वारे निघणारा रासायनिक कचरा सरासर कोलडेपो व कोलवासी येथील कोळसामध्ये मिश्रीत करण्याकरीता या प्रकल्पाद्वारे विकला जात आहे. त्यामुळे घातक वायु प्रदुषण निर्माण होत आहे. या प्रकल्प परिसरातील विद्युत केंद्रामध्ये लागणारा कोळसा हाताळणी करतांना हवेमध्ये घातक वायु प्रदुषण व पर्यावरणावर कुठल्याही प्रकारच्या उपयायोजना होत नसल्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे. या प्रकल्प परिसरातील लोह खनिज हाताळणी करतांना हवेमध्ये सुक्ष्म कण उडत असल्यामुळे घातक वायु प्रदुषण निर्माण होत आहे. या प्रकल्प परिसरातील जड वाहतुकीमुळे घातक वायु प्रदुषण निर्माण होत आहे. प्रकल्पामधील सायलो लिकेज होत असल्यामुळे प्लॅयॲश हवेमध्ये उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. लॉयट्स मेट्ल अॅण्ड एनर्जी लि. या प्रकल्पाद्वारे सायंकाळी ६.०० ते दुस-या दिवशी सकाळी ९.०० वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात घातक वायू प्रदूषण होत आहे. प्रकल्पाद्वारे वारंवार पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे प्रकल्पाची पर्यावरण मंजुरी रद्द अशी मागणी राजेश वारलुजी बेले संस्थापक अध्यक्ष,संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था, चंद्रपूर करण्यात आली आहे.