Sunday, December 7, 2025
HomeChandrapurसेवाभावातून मिळणारा आनंद अमूल्य — सुधीर मुनगंटीवार
spot_img

सेवाभावातून मिळणारा आनंद अमूल्य — सुधीर मुनगंटीवार

सेवाभावातून मिळणारा आनंद अमूल्य — सुधीर मुनगंटीवार

Jyotsna Wankhede:

“सेवाभावातून मिळणारा आनंद हा कोणत्याही सन्मानापेक्षा मोठा असतो,” असे मत महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते ‘वयोश्री योजना’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित सहाय्यक उपकरण वाटप शिबिरात बोलत होते.

हा उपक्रम भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO), मुंबई यांच्या वतीने तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चंद्रपूर व दिव्यांग कौशल्य विकास संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्ण नगर, चंद्रपूर येथे पार पडला.

या शिबिरात समाजातील ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र, व्हीलचेअर, कोमोड चेअर, वॉकर, स्टिक, गुडघा, मणका व कंबर पट्टे यांसारखी विविध सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आली. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ व आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला.

कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चंद्रपूरचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाचे संचालन निलेश पाझारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवी लोणकर यांनी केले.
यावेळी मनोज सिंघवी,नम्रता ठेमस्कर, किरण बुटले, चंद्रकला सोयाम, जयश्री जुमडे, धनराज कोवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.आशिष बाराबदे, पियुष मेश्राम, सुभाष मुरस्कर, आरिफ खान,  आशिष गिरडकर यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमास प्रलय सरकार, उमेश आष्टणकर, अमित निरंजने, डॉ. दीपक भट्टाचार्य, श्री. जुमडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात सेवाभावाची नवी परंपरा रुजत असल्याचे प्रतिपादनही या प्रसंगी करण्यात आले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page