Saturday, December 6, 2025
HomeParbhaniदिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सूर, शब्द आणि भक्तीरसांची उधळण.
spot_img

दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सूर, शब्द आणि भक्तीरसांची उधळण.

दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सूर, शब्द आणि भक्तीरसांची उधळण.

Jyotsna Wankhede:- येथील श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात सोमवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता “दिवाळी पहाट” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सूरांच्या दीपांनी आणि भावनांच्या सुरावटीने दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.श्रुती संगीत विद्यालय प्रस्तुत, विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुरेल संगीताचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. संयोजक रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर व गंगाधर कान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे ओघवते आणि कवितामय निवेदन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले. गायक अमोल मोरे यांनी राग मियां की तोडी मध्ये झपताल व तीनताल मध्ये बंदिश, पहाडी रागामध्ये ‘सैयां बिना घर सूना’ ही ठुमरी, शब्दावाचून कळले सारे हे भावगीत, घेई छंद मकरंद हे नाट्यगीत, तुझी सेवा करीन मनोभावे हा राग मिश्र जोग वर आधारित अभंग, अबीर गुलाल उधळीत रंग, भैरवी मध्ये हेची दान देगा देवा अप्रतिम सादरीकरण करून सेलूतील संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. यात अशोक मोरे, एड विशाल मोरे यांनी तबला साथ तर पूजा तोडकर यांनी हार्मोनियम साथ दिली. सहगायक म्हणून सतीश राठोड व विलास शेरे यांनी साथ दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, अशोक काकडे, गोविंद जोशी, प्राचार्य विनायक कोठेकर, जयप्रकाश बिहानी, नंदकिशोर बाहेती, किशोर जोशी, शिवाजी महाराज खवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा अधिक खुलला. संगीत, संस्कृती आणि स्नेहाचा संगम असलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाने रसिकांच्या मनात दीपावलीचे आनंददायी पर्व उजळून टाकले. या कार्यक्रमाने सेलुच्या सांस्कृतिक वातावरणात एक सुरेल भर टाकली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page