Saturday, December 6, 2025
HomeParbhaniसेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवंगत सभापतींच्या प्रतिमांचे अनावरण.
spot_img

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवंगत सभापतींच्या प्रतिमांचे अनावरण.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवंगत सभापतींच्या प्रतिमांचे अनावरण.

Jyotsna Wankhede: दि. 22 ऑक्टो.रोजी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एक ऐतिहासिक व भावनिक सोहळा पार पडला.
बाजार समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत कार्यरत राहिलेल्या दिवंगत सभापतींच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले.या उपक्रमाची संकल्पना सभापती डॉ. संजय रोडगे यांनी मांडली असून, आजपर्यंत कोणत्याही सभापतींनी असा उपक्रम राबवलेला नव्हता.
दिवंगत सभापती कै. दगड्डु आबा झोडगावकर, कै. रंगनाथ पाटील कदम, कै. रावसाहेब वाघ आणि कै. दत्तराव (जिजा) मोगल यांच्या प्रतिमांचे अनावरण त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमानिमित्त सर्व दिवंगत सभापतींच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सभापती डॉ. संजय रोडगे म्हणाले की,“ज्यांनी बाजार समितीच्या विकासाचा पाया रचला, त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यांच्या आठवणी पुढील पिढीपर्यंत पोहोचाव्यात हा या उपक्रमामागचा हेतू आहे.”या कार्यक्रमास अँड. दत्तराव कदम, श्री. प्रसाद डासाळकर, श्री. केशवराव सोळंके, श्री. माउली ताठे, श्री. रामेश्वर राठी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सभापतीं च्या उपक्रमाचे कौतुक केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page