महालेखाकार नागपूर दोन कार्यालयाचा कारनामा, बोंडे चे केले भोंडे कर्मचाऱ्याला चार महिने मनस्ताप
पेन्शन केस मध्ये महालेखाकार नागपूर दोन या कार्यालयाचा कारनामा उघडकीस आलेला आहे. पैशाच्या आकसापोटी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील बोंडे नावाच्या कर्मचाऱ्यांचे भोंडे करून ठेवल्याचे उघड झाले आहे. त्याला चार महिने पेन्शन उशिरा सुरू होण्याची बाब समोर आलेली आहे. शेवटी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक नेऊन काम करावे लागले. ही सर्व कागदपत्रे आधीच देऊन हे कार्यालय झोपा काढत होते.
ही घटना पी. आर. 7 मधील आहे. या ऑफिस मधील कर्मचारी बाहेर फिरत राहतात आणि पैसे देणारे ग्राहक पाहत राहतात. कॅमेऱ्याची व्यवस्था या ठिकाणी नसल्यामुळे हे सर्व राजरोसपणे घडत आहे.
पेन्शन केस मध्ये अनावश्यक त्रुटी काढतात व त्या कर्मचाऱ्याला फोन करून पैसे मागतात. जवळ जवळ एकसारख्या त्रुटी काढत असल्याची असल्याची बाबही समोर आलेली आहे.
या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात यांनी एजंट नियुक्त केल्याचे चर्चिले जात आहे. ते यांच्या माध्यमातून पैसे उकडून समोरच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचत असल्याची चर्चा समोर येत आहे.