Tuesday, December 9, 2025
HomeAmaravatiप्रकाश विरुद्ध अंधार!
spot_img

प्रकाश विरुद्ध अंधार!

प्रकाश विरुद्ध अंधार!

प्रभू रामचंद्र युद्ध संपल्यानंतर अयोध्येला परत निघाले होते. तेंव्हा रस्त्यातील सर्व गावागावाततुन दिव्यांची रोषणाई केली होती. एका गावात मात्र पुर्ण अंधार होता.
प्रभू रामचंद्रांच्या नजरेत ही बाब आली तेंव्हा त्यांनी रथ थांबवून गावातील लोकांना त्याबाबत विचारले.
गावातील लोकांनी सांगितले,  “आम्हीसुद्धा आपल्या स्वागतासाठी दिवे लावले होते. परंतु, अचानक वादळ आले आणि सर्व दिवे विझून गेले.”
त्यानंतर दिसून आले की, “आमच्या अंधारामुळे आपला राजवाडा आणखी जास्त चमकत होता.” त्यामुळे आम्ही गावात अंधारच राहू देणे पसंत केले.
आताही असेच घडते आहे, “एकीकडे दारिद्र्य असल्याशिवाय दुसरीकडे श्रीमंती निर्माण होवूच शकत नाही. फ्रिजचा मागील भाग गरम होतो, तेंव्हाच तर आतमध्ये गारवा निर्माण होतो. निवडणुकीत गरीबी हा विषय घ्यायचा, त्याचा कैवार घ्यायला आम्हीच फक्त उरलो आहोत असे भासवायचे आणि निवडून आल्यानंतर श्रीमंतांची घरे कशी भरायची याबाबतचे धोरण पुढे चालवायचे ” हेच देशातील जनता अनुभवत आली आहे.
राम पवार
अमरावती
भ्रमणध्वनी:9284196496
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page