Sunday, December 7, 2025
HomeParbhaniसेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जि.प. सभापती गंगाखेडचे गणेश रोकडे...
spot_img

सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जि.प. सभापती गंगाखेडचे गणेश रोकडे आणि संजय साडेगावकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश.

सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जि.प. सभापती  गंगाखेडचे गणेश रोकडे आणि संजय साडेगावकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश.

Jyotsna Wankhede  : सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संजय साडेगावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर गंगाखेड विधानसभा मतदार संघातील आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे शिलेदार गणेश रोकडे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. नेतेमंडळींनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी च्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रभाकर वाघीकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी बोरसे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम विठ्ठलराव रबदडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सेलूतील माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि रोकडे व साडेगांवकर यांनी पक्षप्रवेश करीत सर्वांना चकित केले.गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर काही माजी सदस्यांनी भाजपात प्रवेश करीत स्थानिक पातळीवरील राजकीय समिकरणे बदलून टाकली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां मध्ये भाजप चांगलीच मजल मारेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे परभणी शहरामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. मागील वीस वर्षापासून सेलू नगरपालिकेमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या विनोद बोराडे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश करून भाजप पक्षाची ताकद चांगलीच वाढवली असल्याचे बोलले जात आहे. विनोद बोराडे हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक मानलेजातात. काँग्रेस पक्षापासूनच विनोद बोराडे हे अशोक चव्हाण यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून राहिले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा देखील होती.पण आता होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विनोद बोराडे यांनी सेलू शहरातील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिंतूर सेलू मतदारसंघात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची आणखी ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे. विनोद बोराडे यांच्या सोबतच वालूर येथील संजय साडेगावकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संजय साडेगावकर यांचा फायदा भाजपला होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.त्याचबरोबर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती गणेश रोकडे यांनी देखील आपल्या शेकडो समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गणेश रोकडे यांची पालम तालुक्यात चांगली ग्रामीण भागात चांगली पकड आहे. गणेश रोकडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आमदार रत्नाकर गुट्टे यांना जोरदार धक्का बसल्याचे बोलले जात आहे. गणेश रोकडे हे सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून त्याचबरोबर जिल्हा परिषदे मध्ये देखील ते पाच वेळा सभासद राहिले आहेत.

एकंदरीतच मागील काही काळापासून परभणी जिल्ह्या मध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. काही दिवसांवर जिल्हा परिषद नगरपालिका, पंचायत समिती निवडणुका लागणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आणि पालकमंत्री या भाजपचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की,आम्ही जरी पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे असलो तरी देशाला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या पंतप्रधान मोदी आणि विकसित महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्या साठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात भाजप पक्ष वाढविण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करणार आहोत. विकसित महाराष्ट्र करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करणे आवश्यक आहे आणि त्याला साथ देण्यासाठीच येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजप पक्ष एक नंबरचा राहिला पाहिजे. राज्यासोबत देशात देखील भाजपचे सरकार राहिले पाहिजे, जेणेकरून भारत हा विकसित राष्ट्र होईल, आणि त्या अगोदर महाराष्ट्र हे विकसित राज्य होईल. यासाठी आपण एकमेकां शी वैरभाव न करता सर्व मतभेद विसरून एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचं मत व्यक्त केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page