खाजगी शाळा शिक्षक संघ यांची बैठक संपन्न

खाजगी शाळा शिक्षक संघाची शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेंद्र पातळे यांचे सोबत दिनांक १२ जुन ला दुपारी ३ ते ५ बैठक झाली.
शिक्षण विभागातील शिक्षक – कर्मचारी यांचे नियमित वेतन विलंबाने होऊ नये यासाठी ई-कुबेर पद्धत वापरली जात आहे. वेतन थेट शिक्षक-कर्मचारी यांचे खात्यात जमा करण्यात येत आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक-कर्मचारी यांचे वेतन एक तारखेला होत नाही, शिक्षक कर्मचारी यांची इच्छा राष्ट्रीयकृत बँकेतुन वेतन मिळण्याची असल्यास त्यास वेतन पथक यांचे कडुन विरोध होऊ नये ही बाब राजेंद्र पातळे यांनी मान्य केली.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक २०१६ पासून नियुक्ती परंतु थकबाकी सत्र २०२३ मध्ये काढण्यात आली या शिक्षक-कर्मचारी यांची माहिती वेतन पथक माध्यमिक यांचेकडून घेऊन खाजगी शाळा शिक्षक संघास अवगत करावी अशी विनंती करण्यात आली.
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन न करता पद भरण्यास परवानगी दिलेली असणे, अंशदान अनुदानित, ४० टक्के, ६० टक्के तुकडी वरील शिक्षकांचे शंभर टक्के अनुदानावर समायोजित करण्यात आले आहे. परंतु अश्या शिक्षकांना तो अतिरिक्त ठरलेल्या टप्प्यावरच वेतन मिळेल असे राजेंद्र पातळे यांनी स्पष्ट केले, संच मान्यता २०२४-२५ नुसार जिल्ह्यातील २४ शाळेतील मान्य शिक्षक संख्या शुन्य आहे या शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन प्रश्न मोठा आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
दिव्यांग उमेदवार पदोन्नती आरक्षण हे समांतर आरक्षण असुन तपासुन निर्णय घेण्यात येईल, अधिसंख्य पदावर कार्यरत व सेवा निवृत्त कर्मचारी यांना वेतन वाढ सेवानिवृत्त विषयक लाभ मंजूर करण्यात आले आहे.
आकाश मुनिम सिडाम मुल यांना विज्ञान सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात आली नाही, त्यांचे व इतर अनुकंपा नियुक्तीस मान्यता प्रदान करणे.
मयत मुख्याध्यापक विजय वासुदेव टिपले विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शंकरपूर यांचे वारस मुलगा आशिष टिपले यांना संस्थेतील शाळेत रिक्त विज्ञान सहाय्यक किंवा लिपिक पदावर नियुक्ती देणे, मयत शिक्षक वसंत चिंधुजी वरभे राजीव गांधी विद्यालय मासळ तहसील चिमूर यांचे वारस मुलगा हिमांशू वरभे यांना जिल्ह्यात इतर रिक्त लिपिक जागी नोकरी देणे, मयत शिक्षक नामदेव मारोती धवस शिवाजी वरभे, विद्यालय बोथली यांच्या वारस मुलगा हर्षल नामदेव धवस यांना, मयत शिक्षक श्रीहरी फक्रुजी आगलावे, शिवाजी वरभे विद्यालय बोथली यांचे वारस मुलगी तेजस्विनी श्रीहरी आगलावे, मयत शिक्षक विजय बाबाराव उडान, राजीव गांधी विद्यालय मासळ तहसील चिमूर यांचे वारस मुलगी कुमारी रितु उडान जिल्ह्यात इतर रिक्त लिपिक पदी नोकरीची शिफारस करणे, मयत शिक्षक प्रा.संतोष कोवे, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय कोरपना यांची विधवा पत्नी अर्चना कोवे यांना लिपिक रिक्त पदांवर नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले.
मयत शिक्षिका माया विठ्ठलराव मेश्राम सीटी विद्यालय बाबुपेठ, चंद्रपूर यांचे वारस मुलगी ऐश्वर्या सातपुते यांना त्यांचे शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त लिपिक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक पदी नोकरी देणे, मयत शिपाई अनिल काकपुरे, सी.टी. माध्यमिक विद्यालय चंद्रपूर यांची वारस भाग्यश्री काकपुरे,बी.ए.डी.एड. यांचे अनुकंपा नियुक्तीबाबत सुनावणी घेण्याचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पातळे यांनी मान्य केले.
माध्यमिक विभागात २८ कर्मचारी यांची गरज असतांना फक्त आठ कर्मचारी आहेत एकही उपशिक्षणाधिकारी नाही तरीही वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ४८० प्रकरणास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे असे राजेंद्र पातळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सीबीएससी,आयसीएससी शाळांना मा.जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी घोषित करण्यात आलेल्या सुट्टींची अंमलबजावणी होत नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे निदर्शनास आणून देण्यात आले ,शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे कार्यालयात प्रलंबित वैद्यकीय अर्जास मंजूरी याबाबत चर्चा करण्यात आली.
चर्चेत सर्वस्वी प्रमोद रेवतकर, किशोर दहेकर, भिमराव भगत, विलास खडसे, मनिष वांढरे, पुरुषोत्तम टोंगे, रविंद्र जेनेकर, धनराज मुनघाटे तसेच कार्यालयीन कर्मचारी यांचा समावेश होता.
|
|








