Sunday, December 7, 2025
HomeEducationजनता महाविद्यालय, गोंडपीपरी येथिल कला शिक्षक मा. श्री. अनराज जी. टिपले, राज्यस्तरीय...
spot_img

जनता महाविद्यालय, गोंडपीपरी येथिल कला शिक्षक मा. श्री. अनराज जी. टिपले, राज्यस्तरीय आर्टिस्ट ऑफ द इयर अवार्ड – २०२५ ने सन्मानित

जनता महाविद्यालय, गोंडपीपरी येथिल कला शिक्षक मा. श्री. अनराज जी. टिपले, राज्यस्तरीय आर्टिस्ट ऑफ द इयर अवार्ड – २०२५ ने सन्मानित

Jyotsna Wankhede:
           जनता महाविद्यालय, गोंडपिपरी येथील कलाशिक्षक मा. श्री. अनराज जी. टिपले यांना अंबाबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती, तर्फे राज्यस्तरीय आर्टिस ऑफ द इयर अवार्ड -२०२५ चा पुरस्कार माननिय खासदार श्री. बळवंतभाऊ वानखेडे, अमरावती जिल्हा, मा. कमलताई गवई, लेडी गव्हर्नर, अमरावती( मा. भुषण गवई , भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या मातोश्री), तसेच मा. सौ. माधुरी सचिन चव्हान संस्थापक, अध्यक्षा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अमरावती यांच्या  शुभहस्ते देण्यात आला. दिनांक-०५ नोव्हेम्बर२०२५ रोज बुधवार ला जोशी सभागृह, श्याम चौक. अमरावती येथे ट्राफी, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
    मा. श्री. अनराज जी. टिपले( कलाशिक्षक) यांच्या कलेच्या क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान, विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकासासाठी केलेलेअथक प्रयत्न आणि शैक्षणिक व सहशालेय कार्यातील आदर्श सेवेसाठी त्यांची निष्ठा, समर्पण भावना आणि परिश्रम हे अनेक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. मा. अनराज जी. टिपले यांनी आजपर्यंत अनेक दैनिकात, मासिकात काव्यचित्रे, व्यंगचित्रे, इलेस्ट्रेशन, पुस्तकाचे मुखपृष्ठ, एकल चित्रकला प्रदर्शनी तसेच शासकीय रेखाकला परिक्षा( एलीमेन्टरी व इंटरमिडिएट ) इत्यादिचे कलाक्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनिय कार्य केलेले आहे.
           त्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्यासाठी, कलेच्या क्षेत्रातील योगदानासाठी व समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याऱ्या कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे.
          यांना पुरस्कार मिळ्याल्याबद्दल चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर चे सचिव मा. डॉ. अशोकभाऊ जिवतोडे प्राचार्य – विकास कोकाटे सर( जनता महाविद्यालय , गोंडपिपरी), मा. श्री. राजु वानखेडे सर सहाय्यक शिक्षक( जनता विद्यालय, डेपो शाखा, बल्लारपूर), कु. कल्पना मनोहर सुर्यवंशी( सहायक अधिकारी जील्हा परिषद, चंद्रपूर), तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा पालक आणि विद्यार्थांनी अभिनंदन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page