Saturday, June 20, 2026
HomeChandrapurआ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पडोलीवासियांची दीर्घकालीन मागणी पूर्ण
spot_img

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पडोलीवासियांची दीर्घकालीन मागणी पूर्ण

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पडोलीवासियांची दीर्घकालीन मागणी पूर्ण

मौजा पडोली येथे स्मशानभूमी बांधकामासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित

Jyotsna Wankhede: जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या दृढ पाठपुराव्यामुळे मौजा पडोली येथील नागरिकांची दीर्घकालीन मागणी आता मार्गी लागली आहे. गावातील स्मशानभूमीच्या बांधकामासाठी तब्बल ₹50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निर्णयामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या बांधकामामुळे स्मशानभूमीची पायाभूत सुविधा सुसज्ज होणार असून, अंतिम संस्काराची प्रक्रिया सन्मानपूर्वक व सुलभ पद्धतीने होण्यास मदत होईल. नागरिकांच्या सांस्कृतिक व सामाजिक गरजांशी निगडित या महत्त्वाच्या सुविधेची उभारणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मोलाचा टप्पा म्हणून पाहिली जात आहे.

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मौजा पडोलीचे सरपंच विक्की लाडसे आणि गावकऱ्यांनी स्मशानभूमी बांधकामासाठी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत, आमदार मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत स्मशानभूमीसाठी ₹50 लाखांचा निधी मिळवून दिला. जनतेच्या मागणीनुसार प्राधान्याने सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमदार मुनगंटीवार यांच्या विकासकामाची ओळख बनली आहे. या निधी मंजुरीनंतर पडोलीवासीयांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री असताना नेहमीच चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या पुढाकाराने सैनिकी स्कूल, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वन अकादमी, रामसेतू, इंजिनिअरिंग कॉलेज आणि अनेक पायाभूत प्रकल्पांमुळे चंद्रपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page