Tuesday, September 15, 2026
spot_img
HomeParbhaniधनादेश अनादार प्रकरणी आरोपीस शिक्षा.

धनादेश अनादार प्रकरणी आरोपीस शिक्षा.

धनादेश अनादार प्रकरणी आरोपीस शिक्षा.

Jyotsna Wankhede: धनादेश अनादर बाबत शेख नासेर शेख नबी यांस  न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग सेलू चे न्यायाधीश श्री वैभव आर. गटकळ यांनी आरोपीस धनादेश अनादर बाबत एका महिन्याचा कारावास तसेच धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम एक लाख सोळा हजार दोनशे रुपये तसेच प्रकरणाचा खर्च फिर्यादी बँकेस दहा हजार रुपये एका महिन्यात देण्याचा आदेश पारित केला. याबाबत हकीकत अशी की, सेलू येथील देवगिरी नागरी सहकारी बँक मर्यादितऔरंगाबाद शाखा, सेलू येथे आरोपी शेख नासर शेख नबी यांनी बँकेची रक्कम परतफेड न केल्याने बँकेचे वसूली साठी पाठपुरावा केल्यानंतर आरोपी शेख नासर शेख नबी यांनी बाकी रकमेपैकी अठावन्न हजार दोनशे रुपयांचा धनादेश बँकेच्या हक्कात दिला. सदरील धनादेश बँकेने वटविण्या साठी दिला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्या मुळे उपरोक्त  धनादेश अनादर झाला .त्यानंतर बँकेच्या वकिला मार्फत कायदेशीरपणे रक्कम मिळण्यासाठी आरोपीस नोटीस देण्यात आली .नोटीस दिल्या नंतरही मुदतीत रक्कम न दिल्यामुळे बँकेतर्फे धनादेश  अनारदाराबाबत प्रकरण न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सेलू येथे १३८ निगोशिएरबल इन्स्ट्रुमेंट कायद्यातनन्वे प्रकरण दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सह न्याय दंडा धिकारी प्रथम वर्ग सेलूचे न्यायाधीश श्री वैभव आर. गटकळ यांनी आरोपीस धनादेश अनादर झाल्याबद्दल प्रकरण सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवून एक महिन्याचा कारावासाची शिक्षा तसेच धनादेशच्या दुप्पट रक्कम एक लाख सोळा हजार दोनशे रुपये नुकसान भरपाई फिर्यादी बँकेस एक महिन्यात देण्याचा आदेश पारित केला तसेच जर उपरोक्त रक्कम एक महिन्यात न दिल्यास एक महिन्याच्या कारावास तसेच फिर्यादीने दहा हजार रुपये फिर्यादी बँकेस अर्जाच्या खर्चा पोटी एक महिन्यात देण्याचा आदेश दिनांक १६.१०.२५ रोजी पारित केला. फिर्यादी देवगिरी नागरी बँक औरंगाबाद शाखा सेलूच्या वतीने अँड.एल. एच. खोना यांनी बँकेतर्फे बाजू मांडली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page