Sunday, December 7, 2025
HomeYojnaस्वाधार योजना अर्ज नोंदणी करीता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत
spot_img

स्वाधार योजना अर्ज नोंदणी करीता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत

स्वाधार योजना अर्ज नोंदणी करीता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत

चंद्रपूर( जीमाका) : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसाईक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टल वर ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे.
स्वाधार योजनेचे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज प्रक्रिया सुरू झालेले असून सदर अर्ज नोंदणीची  अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 आहे. तरी जिल्ह्यातील स्वाधार योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांनी https//hmas.mahait.org या पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाईनरित्या अर्ज नोंदणी करावे. तसेच सदर अर्जाची प्रत संपूर्ण कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करावी. ज्या विद्यार्थ्यांनी  30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी केले नसल्यास व स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page