Monday, September 21, 2026
spot_img
HomeChandrapurसौ. केशनी हटवार महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्काराने सन्मानित....

सौ. केशनी हटवार महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्काराने सन्मानित….

सौ. केशनी हटवार  महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्काराने सन्मानित….

महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान सर्वांना प्रेरणादायी… डॉ नितीन वाघमोडे  आयुक्त

महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार २०२५…

Jyotsna Wankhede:

साने गुरुजी सोसायटी भद्रावती येथील रहिवासी सौ. केशनी ज्ञानेश हटवार यांना  स्त्रि कर्तृत्वा साठी  दिला जाणारा  “महाराष्ट्र नारीशक्ती समाज रत्न” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गौरव कर्तुत्वाचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न”  पुरस्कार वितरण सोहळा हा १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत  मोठ्या थाटात संपन्न झाला.

भद्रावती येथील सौ केशनी ज्ञानेश हटवार यांच्या सामाजिक, साहित्यिक व आकाशवाणी वरून प्रसारित झालेला कार्यक्रमाची दखल घेऊन, ए. डी. फाउंडेशनच्या वतीने  दिला जाणारा प महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.

ए डी फाउंडेशन च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार 2025  या सोहळ्याचे आयोजन सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष  डॉ नितीन वाघमोडे आयकर आयुक्त, पुणे तर प्रमुख अतिथी म्हणून  प्रा. डॉ अंजना खताळ विधीज्ञ, मुंबई प्रा शिवाजी खांडेकर सरचिटणीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, एडवोकेट कु. प्रियदर्शन कोकरे सुप्रसिद्ध व्याख्याती, डॉ सारिका महेश शहा मिस इंडिया 2018, मिस वर्ल्ड 2021, अशोक श्रीपती गोरड संस्थापक अध्यक्ष ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रा. महादेव माहानूर, कार्याध्यक्ष ए डी फाउंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत  असलेल्या व आपल्या कर्तुत्वाचा ठसा समाजात उमटलेल्या कर्तृत्ववान महिलांचा महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील 101 महिलांना प्रशस्तीपत्र  व सन्मान चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ऍडव्होकेट डॉ अंजना खताळ, कु. प्रियदर्शनी कोकरे, डॉ सारीका शहा, प्रा. शिवाजी खांडेकर  आदींनी यथोचित मार्गदर्शन केले.  याप्रसंगी सौ केशनी ज्ञानेश हटवार, भद्रावती, मा. अश्विनी लाटकर , शिक्षणाधिकारी, संभाजी नगर, रेवतकर मॅडम सिंदेवाही अशा काही महिलांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

 सौ केशनी ज्ञानेश हटवार यांचे आकाशवाणी वरती भरपूर कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. विज्ञान जगत, स्त्री सक्षमीकरण, स्त्री आरोग्य, स्त्री संघटना, पर्यावरण विषयक जाणीव जागृती, साहित्यिक कार्यक्रम, हॅलो सखी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम आकाशवाणी वरून प्रसारित झाले. त्या सोबतच सामाजिक , साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अनेक कवी संमेलनात त्या सहभागी होतात.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ए.डी. फाउंडेशन च्या वतीने देता जाणारा   महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने कार्य करण्याची नवी उर्मी मिळते, या विचार सूत्रावर आयोजित केलेल्या ए. डी. फाउंडेशनच्या  महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला असल्याचे  फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अशोक गोरड यांनी प्रस्तावनेत सांगितले. सौ. केशनी ज्ञानेश हटवार यांना  महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गोरड यांनी केले.  प्रा. महादेव महानूर यांनी  कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन मनाली कोकरे यांनी केले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त महिला व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने या देखण्या सोहळ्यात उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page