Friday, December 12, 2025
HomeChandrapur“हमारा शौचालय – हमारा भविष्य” जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ
spot_img

“हमारा शौचालय – हमारा भविष्य” जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ

“हमारा शौचालय – हमारा भविष्य” जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ

चालबर्डी गावात सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन

Jyotsna Wankhede:
चंद्रपूर जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभाग तसेच पंचायत समिती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने “हमारा शौचालय, हमारा भविष्य” या जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ ग्रामपंचायत चालबडी येथे करण्यात आला. जिप शाळेजवळ नव्याने उभारलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. बंडू आकनुरवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. प्रियांका सोयाम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये उपसरपंच गणेश नागपूरे व एसबीएम तालुका समन्वयक सौ. सपना पुरमशेट्टीवार उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. आकनुरवार यांनी जागतिक शौचालय दिनाचे महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी भाषणात नमूद केले की, या मोहिमेचा उद्देश केवळ स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने शौचालयाच्या वापरापुरता मर्यादित नसून, सार्वजनिक व घरगुती शौचालयांची दुरुस्ती, नियमित देखभाल, कार्यक्षमतेचे मूल्यमापन,
तसेच आवश्यक ठिकाणी पर्यायी सुविधा निर्माण करणे यावर विशेष भर देणे हा आहे. अभियानाच्या कालावधीत ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करून शौचालयांचे रंगरंगोटी, सुशोभीकरण व स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाला स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद (IEC) तज्ञ कृष्णकांत खानझोडे, संजय धोटे, साजिद निजामी, अंजली डाहूले, प्रकाश उमक, पायल फटिंग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page