Friday, December 12, 2025
HomeParbhaniसेलू नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार.
spot_img

सेलू नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार.

सेलू नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी  लढत होणार.

राष्ट्रवादीसह एकूण 13 उमेदवार रिंगणात; सदस्य पदाकरीता 30 इच्छुकांची माघार : 185 उमेदवार रिंगणात.

Jyotsna Wankhede: दि.22 सेलू नगरपालिकें तर्गत नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या रिंगणातून 15 पैकी 2 उमेदवारांनी आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारी च्या अंतीम मुदतीत माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्ष पदाकरीता प्रत्यक्ष लढतीत एकूण 13 उमेदवार शिल्लक राहीले आहे. त्यामुळे या पदा करीता भारतीय जनता पार्टी विरुध्द काँग्रेस अशीच थेट लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सदस्य पदाकरीता एकूण 13 प्रभागातून 30 उमेदवारांनी  आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत सपशेल माघार घेतली. त्यामुळे एकूण 185 उमेदवार रिंगणात लढत देणार, हे स्पष्ट झाले आहे.सेलू नगर पालिकेत अध्यक्षपदाकरीता 15 उमेदवारांचे तर सदस्य पदाकरीता 216 उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेअखेर पात्र ठरले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पात्र उमेदवारी अर्जामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे स्थानिक नेते व प्रबळ उमेदवार चक्रावून गेले. हौशा-नवशा- गवशांसह अन्य काही हेवेदावे व नाराजीपोटी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना रिंगणाबाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा मत विभागणीत हे उमेदवार धोकादायक ठरतील, हे ओळखून स्थानिक नेतेमंडळी व प्रबळ उमेदवारांनी पडद्याआड अडथळा ठरणार्‍या त्या मंडळां च्या माघारी करीता प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली. त्यामुळेच उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी कोण माघार घेणार अन् कोण रिंगणात राहणार, याबाबत उत्कंठता निर्माण झाली होती. शुक्रवारी दुपारी 3 वाजता हे चित्र स्पष्ट झाले.सेलू पालिके तील नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या रिंगणातून अशोक पुंजाजी अंभोरे, भगवानराव लक्ष्मणराव सिरसाट या दोघांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली. तर प्रभाग क्रमांक 2 मधून नरेंद्र भगवानराव दिशागत, अशोक नारायण खताळ, प्रभाग 3 मधून रफिया बेगम सलीम मिया कुरेशी, अश्‍विनी लक्ष्मणराव धापसे, प्रभाग 4 मधून रमेश मारोती दौड, प्रभाग 5 मधून गणेश शिवाजी निवळकर, शेख अरबाज आमीन, अकबर सरवर खान, प्रभाग 6 मधून जयश्री विठ्ठल कोक्कर, लक्ष्मी संदीप बोकन, संदीप शंकर बोकन, शेख मकसुद शेख महेबुब, प्रभाग 7 मधून छबुबाई बबनराव गायकवाड, प्रभाग 8 मधून शैलजा जयप्रकाश लोया, प्रभाग 9 मधून सचिन ब्रम्हाजी धापसे, रुपाली रमेशसिंह ठाकूर, प्रभाग 10 मधून सत्यनारायण पन्नालाल तिवारी, मोहम्मद सादेक मोहम्मद अय्युब, प्रभाग 11 मधून सुनील राजाराम काळे, कुशावर्ता गणेश चव्हाण, शेख रेहाना परवीन फारुख अहेमद, कमल बालाजी मुक्कावार, रुपाली रमेशसिंह ठाकूर, प्रभाग 12 मधून रवि दामोदर कवळे प्रभाग 13 मधून स्वाती शंकर केवारे यांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.मिलींद सावंत विरुध्द आत्माराम साळवे, अँड विष्णू ढोले अशी तिरंगी यांच्यात लढत होणार. नगराध्यक्ष पदाकरीता भारतीय जनता पार्टीने निवडणूकीच्या रिंगणात मिलींद सावंत यांची तर काँग्रेसने आत्माराम साळवे यांची तर शरदचंद्र पवार गटाकडून ॲड विष्णू ढोले यांचीउमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या तिघांतच आता तूल्यबळ लढत होणार, हे निश्‍चित आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ढोले व अन्य एकूण 10 असे एकूण 13 उमेदवार प्रत्यक्ष लढतीत आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page