Jyotsna Wankhede:
दिनांक: 27 नोव्हेंबर 2025 रोज गुरुवार ला मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत दौड फार संविधान व संविधान जागर अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या शाळेच्या प्राचार्य सौ आसमा खान खलिदी मॅडम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती अस्मिता वनकर मॅडम समाज कल्याण विभाग चंद्रपूर या होत्या.
अस्मिता वनकर मॅडम यांनी संविधानासंबंधी विस्तृत माहिती विद्यार्थिनींना दिली तर प्राचार्य अस्माखान मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन व आभार श्रीमती भाग्यश्री आमटे मॅडम यांनी केले.