Friday, December 12, 2025
HomeChandrapur3 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धा
spot_img

3 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धा

3 डिसेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध क्रीडा स्पर्धा

चंद्रपूर( जीमाका): प्रत्येक वर्षी 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या वर्षाची थीम ‘सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग – सर्वसामावेशक समाज घडविणे’ अशी आहे.  3 डिसेंबर 2025 रोजी जिल्हयातील शासकिय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनाचा सहभाग घेऊन  दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा/ कर्मशाळा मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा 3 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे  सकाळी 8 वाजता  येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच सायंकाळी 5 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याशिवाय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विभागाचा परिचय, शासकिय योजना, विभागाचे धोरण/ कायदे/ नियम/  दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन, शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. क्रीडा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांगांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आहवन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page