Thursday, April 30, 2026
HomeNagpurअल्पसंख्याक संस्था व आदिवासी आश्रम शाळा शिक्षक नियुक्ती भ्रष्टाचार, आढावा घेण्याचे मान्य...
spot_img

अल्पसंख्याक संस्था व आदिवासी आश्रम शाळा शिक्षक नियुक्ती भ्रष्टाचार, आढावा घेण्याचे मान्य ! आयुषी सिंह,(आय ए एस ) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर

अल्पसंख्याक संस्था व आदिवासी आश्रम शाळा शिक्षक नियुक्ती भ्रष्टाचार, आढावा घेण्याचे मान्य ! आयुषी सिंह,(आय ए एस ) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर 

Jyotsna Wankhede:
विदर्भ  आदिवासी आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ ला एक दिवसीय धरणे आंदोलनाचे अनुषंगाने आयुषी सिंह,(आय ए एस ) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर यांनी त्यांचे दालनात बुधवार दिनांक १० डिसेंबर ला बैठक आयोजित केली यात आदिवासी आश्रमशाळा अल्पसंख्यांक दाखवून शिक्षक नियुक्तीत  रुपये कोटीचा भ्रष्टाचार, याबाबत आढावा घेण्याचे मान्य केले आहे
         अपुऱ्या वेतन अनुदानांमुळे दरमहा वेतन न होणे यात चंद्रपूर,भंडारा व वर्धा जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालय माहे सप्टेंबर दिवाळी पुर्वी वेतन न होणे, नोव्हेंबर चे वेतनाबाबत चर्चा करण्यात आली.
         वर्धा जिल्हा प्रकल्प कार्यालय सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी यांचे पेन्शन प्रकरणे उशिराने पाठविण्यात येते, प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदास दिलेल्या मान्यता तपासणे, शिक्षकांना अभ्यास पाळी एवजी रात्र पाळीचा आग्रह धरणे, यावरून शिक्षकांना होणारा त्रास, विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांच्या वेतनावाढी थांबविणे, समायोजनात समाज कल्याण विभाग यांचा नियमित वेतनासाठीचा आदेश बदलुनही आदिवासी विकास विभाग जुण्याच आदेशावरून अतिरिक्त कर्मचारी यांचे वेतन न काढण्याबाबत कार्यवाही सुरू आहे याबाबत निर्णय घेणे.
        पर्यवेक्षक पदासाठी प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन एकुण संख्या सोळा गृहित धरल्याचे अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांनी सांगितले,
    वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रत्येक महिन्याला आढावा घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयास सुचना श्रीमती आर जी गुट्टे यांचे सेवा पुस्तिकेत घेतलेल्या चुकीच्या नोंदीचा आढावा एटीसी कार्यालय घेईल असे मान्य करण्यात आले.
      आयुषी सिंह अप्पर आयुक्त, विद्यार्थ्यांना रोज शाळेत मिळणारे भोजनाबाबत घेत असलेल्या आढाव्याबाबत संघाचे सचिव हेमंत कोचे यांनी आभार व्यक्त केले, संघाने यापुर्वीही मा. अप्पर आयुक्त यांच्या बैठकीत अनेक वर्षांपासून हा विषय लावून धरलेला होता असे माजी आमदार नागोराव गाणार यांनी आठवण करून दिली,  शासन स्तरावरिल व अल्पसंख्याक संस्था व आदिवासी आश्रम शाळा शिक्षक नियुक्ती भ्रष्टाचार प्रश्नांबाबत शुक्रवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
       बैठकीत सर्वश्री सहाय्यक आयुक्त दिगंबर चव्हाण,नागोराव गाणार माजी शिक्षक आमदार, संघाचे मार्गदर्शक प्रमोद रेवतकर, हेमंत कोचे, सुरेश राठोड, मिलिंद निंबुलकर,भरत मेश्राम, चंद्रकांत मसराम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page