Monday, April 20, 2026
HomeYojnaआ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे सुटला १५ गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे सुटला १५ गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे सुटला १५ गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न

आ. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा ग्रीड योजना सुरू करण्याच्या दिल्या होत्या सूचना
गावकऱ्यांनी मानले आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

Shreyash Wankhede:

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. महिन्याच्या सुरुवातीला आढावा बैठक घेऊन १५ गावांची पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार कार्यवाही करीत प्रशासनाने या गावांचा पाणी पुरवठा सुरू केला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईने होणारी अडचण दूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

पोंभुर्णा ग्रीड अंतर्गत १ जून २०२२ ला १५ गावांची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे (मजीप्रा) कार्यान्वीत करण्यात आली. त्यानंतर मजीप्रातर्फे ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न झाला. परंतू, १५ पैकी ८ गावांना पाणी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे योजना हस्तांतरीत होऊ शकली नव्हती. त्याचवेळी मजीप्राकडे वीज देयकाचा भरणा करण्याकरीता निधी नसल्यामुळे ही योजना डिसेंबर २०२४ मध्ये बंद पडली. आणि १५ गावांची योजना बंद झाल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली.

माजी उपसभापती पोंभूर्णा विनोद देशमुख यांनी यासंदर्भात आ. श्री. मुनगंटीवार यांना कळवले. त्यानंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे दि. ५ एप्रिल २०२५ रोजी आढावा सभा घेतली. १५ गावांतील लोकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे. त्यामुळे योजना सूरू करण्याबाबत गावकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे आग्रह धरला. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ योजना सुरू करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर आ. मुनगंटीवार यांच्या आदेशांनुसार जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे २५ एप्रिल २०२५ रोजी पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज देयकाचा ५.७१ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला व पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सूरू करण्यात आला.

गावकऱ्यांनी मानले आभार
आ. श्री. मुनगंटीवार यांनी आढावा सभा घेऊन निर्देश दिल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आमच्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला, या शब्दांत गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या १५ गावांना झाला लाभ
चक ठाणेवासना, नवेगाव मोरे, चक नवेगाव, मोहाडा रै, वेळवा, सेलूर नागारेडी, चक कोंसबी-1, फुटाना, देवाडा खुर्द, जाम तु., रामपूर दीक्षित, बोर्डा दीक्षित, कसरगट्टा, चक घनोटी-1, जाम खु. या गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page