Monday, May 25, 2026
HomeParbhaniयोगेश ढवारे यांचे विभागीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत यश.
spot_img

योगेश ढवारे यांचे विभागीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत यश.

योगेश ढवारे यांचे विभागीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत यश.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. 

ज्योत्स्ना वानखेडे: येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील सहशिक्षक श्री योगेश ढवारे यांनी शिक्षक ,अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित विभागीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत यश संपादित केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई येथे  संभाजी नगर विभागीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धा संपन्न झाली.या विभागीय स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातून एक अशा 42 स्पर्धकातून एकूण 4 स्पर्धक हे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत या स्पर्धेत योगेश ढवारे यांनी सादर केलेल्या काव्य रचनेने यश संपादन करून राज्य स्तरासाठी ते पात्र ठरले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, समन्वयक अंजली पद्माकर,श्री के बा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एड अनिरुध्द जोशी, उपाध्यक्ष डॉ सुनिल कुलकर्णी, सचिव महेश खारकर, सहसचिव अभय सुभेदार तथा संचालक मंडळ आदिसह मुख्याध्यापक संजय धारासुरकर, सिद्धार्थ एडके यांनी अभिनंदन केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page