बल्लारपूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. अल्काताई वाढई व १७ नगरसेवकांचा भव्य सत्कार संपन्न.
खा. प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, संतोषसिंग रावत यांची उपस्थिती.
ज्योत्स्ना वानखेडे: बल्लारपूर नगर परिषदेच्या सत्तेवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित करत नगराध्यक्षपदी सौ. अल्काताई वाढई यांची निवड झाली असून, नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा काँग्रेसच्या १७ नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा बल्लारपूर येथे उत्साहात पार पडला.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. अल्काताई वाढई यांच्यासह नगरसेवक छाया रमेश मडावी, वैष्णवी अजय जुमडे, शिल्पा तुळशीराम चुटे, अमकुबाई चंदुलाल भुक्या, मोना प्रमैद धानोरकर, शेख अब्दुल करीम अब्दुल रहिम, वैशाली मिलिंद हुमने, सय्यद मुकद्दर सय्यद हमजा, प्रियंका भारत थुलकर, मेधा अनिल भाले, इस्माईल दादाभाई ढाकवाला, देवेंद्र सत्यदेव आर्य, शारदा भाष्कर माकोडे, सुनीता गजानन जिवतोडे, करूणा नरसय्या रेब्बावार, रवि चंद्रय्या मातंगी, पवन देवराव मेश्राम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी खासदार सौ. प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. सुनील कुल्दीवार, डॉ. अनिल वाढई, भाष्कर माकोडे, नरेश मुंदडा यांच्यासह बल्लारपूर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना मान्यवरांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करत बल्लारपूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. जनतेने दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण व नागरी सुविधा यांना प्राधान्य देण्याचा निर्धार नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. काँग्रेसच्या या विजयामुळे बल्लारपूरच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.