Saturday, May 2, 2026
HomeChandrapurजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित अंतिम मुदत 12 जानेवारी 2026 पर्यंत
spot_img

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित अंतिम मुदत 12 जानेवारी 2026 पर्यंत

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित अंतिम मुदत 12 जानेवारी 2026 पर्यंत

चंद्रपूर( जीमाका):  क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेच्या वतीने जिल्ह्यातील तीन सर्वोत्कृष्ट गुणंवत खेळाडू (महिला, पुरुष व दिव्यांग) व एक गुणंवत क्रीडा मार्गदर्शकाला पुरस्कार दिले जातात.
त्या अनुषंगाने सन 2024-25 करिता चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू, व क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज 12 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड (मो. क्र. 9423673232) यांच्याकडे उपलब्ध आहे. तसेच हे अर्ज 12 जानेवारी 2026 रोजी पर्यत कार्यालयीन वेळेत सादर करावे. उशीरा येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज सादर करताना अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत 10 वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्यांनी वयाची 35 वर्ष पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याच्या मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत खेळामध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. तसेच अर्ज करीत असतांना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासननिर्णय दि. 14 डिसेंबर 2022 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियमातील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे.
वरील सर्व पुरस्कारामध्ये प्रत्येकी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख 10 हजार रुपये या बाबींचा समावेश आहे. पुरस्काराकरिता निवड झालेल्या पुरस्कार्थींना 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page