Monday, April 20, 2026
HomeParbhaniसावित्रीबाई यांच्याकडे समाजपरिवर्तनाची दृष्टी होती- राजेंद्र पवार.
spot_img

सावित्रीबाई यांच्याकडे समाजपरिवर्तनाची दृष्टी होती- राजेंद्र पवार.

सावित्रीबाई यांच्याकडे समाजपरिवर्तनाची दृष्टी होती- राजेंद्र पवार.

Jyotsna Wankhede: सावित्रीबाई फुले ज्या सामाजिक वातावरणात जन्माला आल्या ते वातावरण अत्यंत प्रतिघामी विषम आणि अ मानवी होते. जातीभेद हा समाज व्यवस्थेचा कणा मानला जात होता. जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठतेचे नियम इतके कठोर होते की माणसाच्या आयुष्याची दिशा त्यांच्या जन्माने ठरवली जात होती. अस्पृश्यतेच्या नावाखाली समाजातील मोठ्या वर्गाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला गेला होता. स्त्री ही पुरुषाची मालमत्ता समजली जात होती .शिक्षण, स्वातंत्र्य, मतप्रदर्शन, आणि निर्णयक्षमता, या गोष्टी स्त्री शिक्षासाठी निशिद्ध मानल्या जात होत्या, बालविवाह बहुपत्नीत्व विधवांचे केशवपण, धार्मिक, अंधश्रद्धा, सामाजिक, बहिष्कार आणि मानसिक छळ या प्रथा समाजमान्य होत्या. अशा परिस्थितीत जन्म घेऊनही सावित्रीबाई फुले यांनी या व्यवस्थेला निमितपणे स्वीकारले नाही, तर तिच्या विरोधात उभे राहण्याचे अपूर्व धैर्य दाखवले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत सावित्रीबाईचा जीवनप्रवास हा केवळ पती-पत्नीचा सहवास नव्हता, तर तो विचार समानतेवर आधारित सामाजिक संघर्षाचा सहप्रवास होता. ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि समाज परिवर्तनाची दृष्टी दिली त्या काळा स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे समाजाच्या रुढीला उघड आव्हान देणे होते .शिक्षण घेतल्यानंतर सावित्रीबाईंनी हे स्पष्टपणे ओळखले की शिक्षणाशिवाय समाजातील शूद्र अतिशूद्र आणि दलित स्त्रिया कधी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होऊ शकणार नाहीत. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र पवार यांनी केले.

सावित्रीबाई फुले यांच्या पुढाकाराने स्त्रियांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचे धडे गिरवता आले. स्त्री केवळ चुल आणि मुल या चक्रव्यूहात न अडकता ती परिवर्तनशील झाली पाहिजे. जातीभेद नष्ट करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर पावलं उचलली तरी चालतील. परंतु बुरसटलेल्या विचारांना थारा न देता स्त्री पुढे आली पाहिजे असं सावित्रीबाईंना वाटत होतं. आज आपण सर्व स्त्रीयांमध्ये परिवर्तन पाहात आहोत केवळ सावित्रीबाई फुले यांच्या दुरदृष्टीमुळे असं अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा. सुभाष शेळके बोलत होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंडित जगाडे अनिरुद्ध टाके, पांडुरंग कोरडे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ शरद कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन महादेव आगजाळ आभार सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी मानले.

कार्यक्रमासाठी राजेंद्र पवार, प्रा.के डी. वाघमारे, राजेंद्र शेळके, रामचंद्र गजमल, सदाशिव भालेराव, हरिभाऊ शेवाळे, संपतराव झोडगावकर, सुयोग साळवे, बालाजी शेरे आदींची उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page