वालूर येथील हत्याकांडातील अट्टल गुन्हेगार ‘बाबुशा’ गजाआड.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

ज्योत्स्ना वानखेडे: दि.17 तालुक्यातील वालूर येथील मंदिर परिसरात घडलेल्या निर्घृण हत्याकांडाचा अखेर छडा लागला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. आरोपी बाबुराव ऊर्फ बाबुशा सावळ्या पवार (वय 60, रा. पिटोरी शिरसगाव, ता. अंबड, जि. जालना) या सराईत गुन्हेगाराने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने यासह अन्य गुन्हे केल्याची कबुली दिली.दिवाळीच्या सुट्टीदरम्यान वालूर येथील मंदिर परिसरात एका निष्पाप मुलाची डोक्यात वार करून निर्घृण हत्याकरण्यात आली होती. त्याचवेळी एका महिला व पुरुषाला बेदम मारहाण करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या होत्या. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.गुन्ह्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वस्तीपासून दूर शेतात लपून राहत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीनेआरोपीचा माग काढत 15 जानेवारी रोजी त्याला अटक केली.ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, चंद्रसिंह परिहार तसेच पथका तील मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, किशोर लटपटे, रणजित आगळे व इतर अंमलदारांनी यशस्वी केली.