Wednesday, June 3, 2026
HomeChandrapurतृतीयपंथी नागरिकांच्या तक्रारी व समस्या निवारणाकरीता हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध
spot_img

तृतीयपंथी नागरिकांच्या तक्रारी व समस्या निवारणाकरीता हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध

तृतीयपंथी नागरिकांच्या तक्रारी व समस्या निवारणाकरीता हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध

चंद्रपूर( जीमाका): तृतीयपंथीय समुदाय हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. त्यामुळे विकास प्रक्रियेपासून हा समुदाय दूर आहे. तृतीयपंथी समुदायातील व्यक्तिंचे शासनामार्फत मूलभूत अधिकाराचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्याकरीता तृतीयपंथीय व्यक्त्ती (हक्काचे संरक्षण) कायदा, 2019 नियम 2020 संपूर्ण देशात लागू झाला आहे.
तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविणे, त्यांची ओळख निश्चित करणे, याकरिता केंद्र शासनाने नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर हे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे. तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना आकस्मिक परिस्थितीत मदत मिळावी, त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे या करिता नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर या पोर्टलवर नॅशनल हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींनी त्यांच्या तक्रारी व समस्यांच्या निराकरणाकरिता तसेच आकस्मिक स्थितीत मदत मिळणे करिता हेल्पलाईन क्रमांक 14427 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त (समाज कल्याण) विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page