नारायण चौरे यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सलग तिसऱ्यांदा निवड.
ज्योत्स्ना वानखेडे: सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान, सेलू संचलित ज्ञानतीर्थ विद्यालय, सेलू येथील नारायण बाबुराव चौरे यांनी ५३ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी सलग तिसऱ्यांदा निवड होण्याचा मान पटकावला आहे. ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून उत्कृष्ट सादरीकरण करत नारायण चौरे यांनी सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला असून त्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.यापूर्वी त्यांनी
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, सेलू – प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, परभणी – प्रथम क्रमांक
अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.माध्यमिक गटातील शैक्षणिक साहित्य प्रकारात वैज्ञानिक शैक्षणिक साहित्य सादरीकरणासाठी त्यांची निवड झाली असून, विज्ञान विषयातील उत्कृष्ट अध्ययन निष्पत्ती साध्य केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान, सेलू चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक शालिनी शेळके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नारायण चौरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे ज्ञानतीर्थ विद्यालय, सेलू च्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गौरव झाला आहे.