Tuesday, May 26, 2026
HomeParbhaniसुर्यनमस्काराने नवचैतन्य निर्माण होते:- गटविकास अधिकारी उदय जाधव.
spot_img

सुर्यनमस्काराने नवचैतन्य निर्माण होते:- गटविकास अधिकारी उदय जाधव.

सुर्यनमस्काराने नवचैतन्य निर्माण होते:- गटविकास अधिकारी उदय जाधव.

सेलू येथे ८०० विद्यार्थी सुर्य नमस्कार सादरीकरण.

ज्योत्स्ना वानखेडे: दि २४ रोजी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले तर जीवनात नवचैतन्य निर्माण होते. योगासन आणि सूर्यनमस्कार ही आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असायला हवे.यामुळे मन, शरीर स्थिर राहून कठीण प्रसंगात आपली निर्णयक्षमता वाढते असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी केले.येथील  पंचायत समिती गटशिक्षणाधिका री कार्यालय व नूतनविद्यालयात , परभणी जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन वतीने दि २४ जानेवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे होते तर उदघाटक म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव हे होते. व्यासपीठावर बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब खरात,विस्तार अधिकारी संदीप पवार,कवायत तालुका समन्वयक किरण राऊत, मुख्याध्यापिका निशा पाटील, संयोजक क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे, नरेश पाटील, राष्ट्रीय योगपटू शिल्पा पिंपळे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमात विविध शाळांचे जवळपास 800 विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले. अध्यक्षीय समारोप किरण देशपांडे यांनी केला. सुर्य नमस्काराचे प्रात्यक्षिक शिल्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.तसेच यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या सामूहिक कवायत प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले.या सूर्यनमस्कार दिन कार्यक्रमासाठी नूतन विद्यालय, श्री के.बा.विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, शारदा विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, न्यू हायस्कुल आदींसह अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ काशिनाथ पल्लेवाड तर आभार योगेश ढवारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय भुमकर, किशोर ढोके, किशोर खारकर पदमपल्ले, पांडुरंग पाटणकर, बाबासाहेब गोरे, रुपाली कुड, आरती कदम, दायमा, शेरे पांचाळ के.व्ही. एस.आर. दायमा, मुकुंद डमरे सोनाली शेरे, आदी ने परीश्रम घेतले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page