सेलूत हुतात्मादिना निमित्त अभिवादन.
हुतात्मा बहिर्जी शिंदे व महात्मा गांधी यांना अभिवादन.
ज्योत्स्ना वानखेडे: दि 30 जानेवारी शुक्रवार रोजी सेलू शहतील ऐतीहासीक घडी टॉवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे (नाइक ) यांच्या अर्धाकृती पुतळ्यास हुतात्मा दिना निमित्त उपनगराध्यक्ष साईराज बोराडे यांनी अभिवादन केले.तसेच मोंढा परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धा कृती पुतळ्यास नगराधक्ष मिलींद सावंत यांनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नगराध्य मिलींद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोरडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड , प्रा . के डी वाघमारे, प्रशांतसिंह ठाकूर , माजी सैनिक पद्माकर वाकडीकर , पि, टी, निर्वळ, मा जी नगरसेवक विठ्ठल काळबांडे, शुकाचार्य शिंदे, श्रीनिवास उघडे, आदि उपस्थित होते.