Tuesday, April 21, 2026
HomePoliceमौलाना आझाद वॉर्डात अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई; दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा
spot_img

मौलाना आझाद वॉर्डात अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई; दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

मौलाना आझाद वॉर्डात अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई; दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

ज्योत्स्ना वानखेडे:- शहरातील मौलाना आझाद वॉर्ड परिसरात अवैधरीत्या दारू साठवणूक व विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत देशी-विदेशी दारू, बीअर कॅन, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ८३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       या प्रकरणातील आरोपी कवडू पंढरीनाथ डांगे (वय ५०) रा. मौलाना आझाद वॉर्ड, बल्लारपूर व दोन जण आहेत.
          बल्लारपूर पोलीसांना दि. २९ जानेवारी २०२६ रोजी   मौलाना आझाद वॉर्ड परिसरात एका घरातून अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाली असता छापा टाकण्यात आले.
        मिलिंद चौकाजवळील गल्लीतील एका घराची झडती घेतली असता घरामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू, हायवर्ड ५००० बीअर कॅन, दारू विक्रीसाठी वापरण्यात येणारे फ्रिज, टेबल-खुर्च्या, वॉटर कुलर, आर.ओ. प्युरीफायर तसेच भारत पेचे दोन बारकोड स्कॅनर मशीन आढळून आले. या स्कॅनरद्वारे यूपीआयमार्फत आर्थिक व्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले. झडतीदरम्यान ७,८०० रुपयांची रोख रक्कम, डिस्पोजेबल ग्लास तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर व कॅमेरे असा एकूण ८३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
       या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ६८, ८६, ९८(१)(क) व ८३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
       सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, पोहवा यशवंत कुमरे, भास्कर चिचवलकर, पोअं महेश कुकूडकर व सचिन राठोड यांनी केली. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page