Wednesday, February 11, 2026
HomeParbhaniदेवगिरी नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा : ‘बेस्ट बँक ऑफ द...
spot_img

देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा : ‘बेस्ट बँक ऑफ द इयर’ व ‘बेस्ट व्हिजनरी चेअरमन पुरस्कार प्राप्त.

देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा : ‘बेस्ट बँक ऑफ द इयर’ व  ‘बेस्ट व्हिजनरी चेअरमन पुरस्कार प्राप्त.

ज्योत्स्ना वानखेडे:
देवगिरी बँक ठरली बेस्ट बँक, ग्राहककेंद्रित सेवा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विश्वासार्ह बँकिंगच्या जोरावर देवगिरी बँकेस आयकॉनिक लीडर्स अवॉर्ड तर्फे  ‘बेस्ट बँक ऑफ द इयर’  हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
याचबरोबर बँकेचे अध्यक्ष किशोरदादा शितोळे यांना ग्राहकांपर्यंत प्रभावी पोहोच, नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वासाठी ‘बेस्ट व्हिजनरी चेअरमन या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.देवगिरी बँकेच्या वतीने बँकेच्या संचालिका मंगलाताई वाहेगावकर, अमिताताई लेकुरवाळे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण नांदेडकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारले.
ग्राहकांचा विश्वास हेच बँकेचे भांडवल मानून तंत्रज्ञानाधारित सेवा, सुलभ व पारदर्शक व्यवहार, डिजिटल बँकिंग, तसेच सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल या पुरस्कारां च्या माध्यमातून घेण्यात आली आहे.बँकेचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रभावी अध्यक्ष किशोरदादा शितोळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता, ग्राहक संवाद, वित्तीय साक्षरता, नव्या योजना व आधुनिक बँकिंग संकल्पनांच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे.हे पुरस्कार बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक परिश्रमांचे फलित असून, भविष्यातही अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे किशोरदादा शितोळे यांनी नमूद केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page