Saturday, March 14, 2026
HomeExamसंभाजीनगरात 12 वीच्या इंग्रजी पेपरमध्ये गैरप्रकार उघड, तर 19 पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर...
spot_img

संभाजीनगरात 12 वीच्या इंग्रजी पेपरमध्ये गैरप्रकार उघड, तर 19 पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कडक कारवाई

संभाजीनगरात 12 वीच्या इंग्रजी पेपरमध्ये गैरप्रकार उघड, तर 19 पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कडक  कारवाई

Jyotsna Wankhede:

संभाजीनगरात 12 वीच्या इंग्रजी पेपरमध्ये गैरप्रकार उघड झाला आहे, तर या प्रकरणात 19 पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कडक कारवाई केली आहे. सीसीटीव्हीमूळे ही फसवणूक उघड करण्यात आली आहे. दक्षता समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वात मोठी कडक कारवाई करण्यात आली आहे. गैरप्रकाराची गंभीरता लक्षात घेता परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे.

             छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर ता. कन्नड येथे इयत्ता 12 वीच्या इंग्रजी पेपरमध्ये मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्रावरील फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे 19 पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

            दक्षता समितीचे अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती अश्विनी लाटकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथकाने संपूर्ण तपास पूर्ण केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून संभाजीनगर जिल्ह्यातील हा गैरप्रकार उघड करण्यात आला आहे. दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या इंग्रजी पेपरच्या परीक्षेत काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून नक्कल करत असल्याचे दिसले होते. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.

             सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचाली स्पष्ट दिसून आल्या आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात हा गैरप्रकार सिद्ध झाल्याने प्रशासनाने कारवाई केली आहे. या कॉपी प्रकरणात 19 जणांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण 19 जणांविरुद्ध सीसीटीव्हीमूळे ठोस पुरावे मिळाले आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक आणि तिथल्या पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

            संभाजीनगरमध्ये हा गैरप्रकार घडल्यानंतर परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पुढील सर्व परीक्षा शिस्तबद्ध आणि नियमानुसार पार पडाव्यात यासाठी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर आणि विस्तार अधिकारी सिताराम पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तर या कारवाईतून परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे 12 वीच्या परीक्षेत विद्यार्थ्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे, संभाजीनगरमध्ये भविष्यात अशा कॉपी प्रकारांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असे संभाजीनगर जिल्ह्यातील प्रशासनाने म्हटले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page