Thursday, April 16, 2026
HomeEducationजनता विद्यालय ताडाळी (रेल्वे) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
spot_img

जनता विद्यालय ताडाळी (रेल्वे) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जनता विद्यालय ताडाळी (रेल्वे) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Jyotsna Wankhede:

जनता विद्यालय ताडाळी (रेल्वे ) या शाळेत वर्ग नववीच्या विद्यार्थ्यातर्फे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  श्री. जी.पी. भोयर होते. प्रमुख उपस्थिती शाळेच्या पाळी प्रमुख  कु. बच्चे मॅडम होत्या. वर्ग नववीच्या वर्ग शिक्षिका कुमारी उमरे मॅडम, वर्ग दहावीचे वर्गशिक्षक श्री. कौरासे सर  यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले  होते.

प्रथमता: मंचावर उपस्थित मान्यवराच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण  करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे  स्वागत करण्यात आले. दहावीचे विद्यार्थी यश धोटे, कु.मंजुषा चाहारे, कु.निर्मिती दिवसे कु.कंचन दिवसे, कु.दीप्ती बल्की कु.दिपाली सिडाम अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. बी.एम धांडे  सर यांनी सांगितले की विद्यार्थ्या पाशी ज्ञान असल्यामुळे त्यामध्ये पास होण्याची क्षमता असते. त्यासाठी सराव करणे आवश्यक आहे. श्री.पी. डी.उलमाले  सर,श्री कौरासे सर,कु उमरे मॅडम, कु. बच्चे मॅडम, श्रीमती भगत मॅडम, श्रीमती पिदूरकर मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सर्वांनी सांगितले की पेपर मध्ये दिलेली सर्वात अगोदर नियमावली वाचावी. नंतर न घाबरता पेपर सोडवायचे. आधी सोपे प्रश्न सोडवायचे काम करावे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी.पी. भोयर सर यांनी कथन केले की, चांगल्या पदावर जाण्यासाठी शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
श्री. पी.डी. उलमाले सर यांनी सांगितले की, आज आपल्याला आपुलकीने निरोप देण्यात येत आहे.योग्य मार्गाने जाऊन यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. अध्यक्ष भाषण करताना श्री. जी.पी. भोयर सर मुख्याध्यापक यांनी कथन केले की येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला योग्य ती तयारी करणे आवश्यक आहे. आपल्याला निश्चित यश प्राप्त होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी सादिया खान व कु.मिसबा शेख यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित वर्ग नववीच्या वर्गशिक्षिका कुमारी उमरे मॅडम वर्ग दहावीचे शिक्षक श्री. व्ही.ए. कौरासे सर शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. बोबडे बाबू, श्री गोहोकार बाबू, श्री बांबोडे भाऊ, श्री. जुनघरे भाऊ उपस्थित होते. शेवटी स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला व कार्यक्रमाची सांगता झाली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page