Saturday, May 2, 2026
HomeChandrapurआरसीईआरटी, चंद्रपूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप उत्साहात
spot_img

आरसीईआरटी, चंद्रपूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप उत्साहात

आरसीईआरटी, चंद्रपूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप उत्साहात

Jyotsna Wankhede :
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत ISTE च्या सहकार्याने दि. २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित “Interdisciplinary Applications of Electrical Engineering in Smart and Sustainable Technologies (IAEESST-26)” या विषयावरील पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

समारोप सत्रात मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ. अनिल चिताडे यांनी सांगितले की, विद्युत अभियांत्रिकी ही आधुनिक सभ्यतेचा कणा असून, शाश्वततेच्या दृष्टीकोनातून तिची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. शिक्षकांचे कर्तव्य केवळ सूत्रे व सिद्धांत शिकविणे नसून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, नवोपक्रम आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे आहे. शिक्षक स्वतःला अद्ययावत करत राहिल्यास विद्यार्थीही आपोआप प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात, असे प्रतिपादन करण्यात आले.

समारोपावेळी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. आर. के. धात्रक, यांनी सांगितले की,
हा कार्यक्रम केवळ व्याख्याने व सादरीकरणांपुरता मर्यादित न रहाता तो एक परिवर्तनाचा प्रवास व्हावा. पारंपरिक विद्युत अभियांत्रिकीच्या चौकटीपलीकडे जाऊन स्मार्ट ग्रिड, नवीकरणीय ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि शाश्वत विकासातील या शाखेची भूमिका अधिक व्यापकपणे समजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करावा.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत परिणामाधारित शिक्षण (Outcome Based Education), बहुविषयक अध्ययन व उद्योग-संस्थांमधील समन्वय यावर विशेष भर देण्यात आला. या एफडीपीमध्ये नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट ग्रिड, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ग्रीन एनर्जी तसेच पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.

अशा दर्जेदार आणि प्रभावी एफडीपीमुळे संस्थेची शैक्षणिक ताकद अधोरेखित होते, असे मत प्राचार्यांनी व्यक्त केले.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या “Excellence is a continuous process and not an accident” या विचाराचा सुध्दा त्यांनी उल्लेख करत, उत्कृष्टतेच्या दिशेने हा कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगण्यात आले. हा कार्यक्रम केवळ समाप्ती नसून पुढील सहकार्य, संशोधन, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शाश्वत तांत्रिक उपाययोजनांची सुरुवात ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

समारोपावेळी समन्वयक डॉ. एस. वाय. कामडी यांनी संपूर्ण प्रोग्रामची समारोपिय टिप्पनी केली.
तसेच समन्वयक प्रो. अमित आक्केवार यांनी आभार प्रदर्शन करतांना आयोजन समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी मदत करणाऱ्या आभार मानले. ISTE संस्थेच्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका श्रीदेवी आक्केवार यांनी केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page