महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना, नागपूर विभागाच्या विभागीय कार्यकारिणीचा पक्षप्रवेश सोहळा बल्लारशाह येथे
*ज्योत्स्ना वानखेडे*: महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना, नागपूर विभाग यांच्या विभागीय कार्यकारिणीचा पक्षप्रवेश सोहळा बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी रेल्वे इन्स्टिट्यूट, बल्लारशाह येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या केंद्रीय कार्यकारिणी, मुंबई येथून मा. जितेंद्र पाटील, मा. स्वप्निल पंडित, मा. लहुजी थाले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. मनदीप भाऊ रोडे (मनसे जिल्हाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात नागपूर विभागातील विविध रेल्वे कर्मचारी व कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेत प्रवेश करणार असून संघटनेच्या बळकटीसाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तरी सर्व मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते, रेल्वे कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना, नागपूर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ: रेल्वे इन्स्टिट्यूट, बल्लारशाह
दिनांक: बुधवार, २२ जुलै २०२६
वेळ: सायंकाळी ४.०० वाजता
– महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना, नागपूर विभाग