Thursday, June 4, 2026
Homeबल्लारपूरजागतिक महिला दिनानिमित्त रणरागिनी हिरकणी फाउंडेशन बल्लारपूर यांच्या वतीने विविध उपक्रमांनी सजलेला...
spot_img

जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिनी हिरकणी फाउंडेशन बल्लारपूर यांच्या वतीने विविध उपक्रमांनी सजलेला विशेष कार्यक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिनी हिरकणी फाउंडेशन बल्लारपूर यांच्या वतीने विविध उपक्रमांनी सजलेला विशेष कार्यक्रम

ज्योत्स्ना वानखेडे : दिनांक : ०८ मार्च २०२६ रोजी   मार्कडेश्वर हॉल, गोरक्षण वॉर्ड, बल्लारपूर येथे
जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिणी हिरकणी फाउंडेशन, बल्लारपूर यांच्या वतीने विविध उपक्रमांनी सजलेला विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई नगराध्यक्षा, नगरपरिषद बल्लारपूर होत्या.
 प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. मनस्वीताई संदीप गिर्हे नगरसेविका, महानगरपालिका चंद्रपूर
अध्यक्ष – जिजा फाउंडेशन, अँड. मेघा भाले मॅडम सभापती, आरोग्य व बालकल्याण, बल्लारपूर होत्या.
प्रमुख वक्त्या सौ. चैतालीताई खटी  मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाची धनी, सामाजिक कार्यकर्त्या होत्या. विशेष उपस्थिती सौ. वैशाली जोशी अध्यक्ष, भाजप महिला आघाडी, सौ. डॉ. सुविधा प्र. फुलसुंदे (कनकम) MBBS, MD (GMC नागपूर) मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ होत्या.
सौ. अनुराधा वैभव जोशी सांस्कृतिक सचिव रणरागिणी हिरकणी फाउंडेशन, सौ. डॉ. सपना पवन जैन अध्यक्ष, रणरागिणी हिरकणी फाउंडेशन, बल्लारपूर होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. डॉ. अलका अनिल वाढई यांचे शाल, सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या सशक्तीकरणाबाबत प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page