प्रा. डॉ. किशोर चौरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
ज्योत्स्ना वानखेडे: शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. किशोर चौरे यांना आदर्श शिक्षक प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार कृष्णाभाऊ खोपडे व आन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, प्रा. डॉ. किशोर चौरे यांनी शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे,
विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षणाची जाणीव निर्माण करणे, इतिहास विषयाच्या अभ्यासाला नवआयम देणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणे यामुळे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रगती करत आहेत, या पुरस्कारामुळे प्रा. डॉ. किशोर चौरे यांच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान झाला असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयातील व विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.