Monday, September 14, 2026
spot_img
HomeParbhaniसेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची तयारी पूर्ण.

सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची तयारी पूर्ण.

सेलूत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची तयारी पूर्ण.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू शहरात 12 मार्च ते 19 मार्च कालावधीत संपन्न होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून अलंकापुरी नगरी सज्ज झाली आहे. 11 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता सेलूचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. अलंकापुरी पारायण, कथा स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. पारायण सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम
12 मार्च ते 19 मार्च या कालावधीत अलंकापुरी नगरी, मयुरी पार्क, सातोना रोड, सेलू येथे दैनिक कार्यक्रम असे असतील. पहाटे 4 ते 6 काकडा आरती, भजन. सकाळी 6 ते 7 विष्णुसहस्रनाम तथा हनुमान चालीसा पठण. सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सोहळा. सकाळी 10 ते 11 भोजन प्रसाद. सकाळी 11 ते दुपारी 1 हरिकीर्तन. दुपारी 2 ते 5 यावेळेत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून महाभारत संदेश कथा. सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ. तर सायंकाळी 6 ते 7 भोजन प्रसाद . रात्री 8 ते 10 हरि कीर्तन होणार आहे.
धर्म ध्वजारोहणाने ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याला प्रारंभ.ध्वजारोहण सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर हे होते. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि ह.भ.प. कृष्णा महाराज रासवे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीत असलेल्या अश्वाचे पुजन आणि धर्म ध्वजारोहण करण्यात आले. व्यासपीठावर नगराध्यक्ष मिलिंद सावंत, नगर सेवक विनोद बोराडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक जयप्रकाश बिहाणी यांनी केले. ह.भ.प. पंडित महाराज डाके यांनी मनोगत व्यक्त केले. तर सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page