Tuesday, September 1, 2026
spot_img
HomeEducationजनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील विद्यार्थिनीची इन्स्पायर अवॉर्ड साठी निवड

जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील विद्यार्थिनीची इन्स्पायर अवॉर्ड साठी निवड

जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील विद्यार्थिनीची इन्स्पायर अवॉर्ड साठी निवड

ज्योत्स्ना वानखेडे:
 भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘INSPIRE Award- MANAK’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील हर्षिता सुनील गेडाम या विद्यार्थिनीची  इन्स्पायर अवॉर्ड साठी निवड झाल्याची घोषणा अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
    हर्षिता सुनील गेडाम  इयत्ता नववी या विद्यार्थिनींची तिच्या नवकल्पनांमुळे या पुरस्कारासाठी निवड झाली असून तिला दहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत  प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी देण्यात येणार आहे.
       ‘INSPIRE Award – MANAK’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड व नवोपक्रमशील विचारसरणी विकसित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
    हर्षीताला शाळेतील नवोपक्रमशील शिक्षक पी. डब्ल्यू. मत्ते, पी. जे. गंगमवार आणि डी. एल. कुबडे तसेच एस. डब्ल्यू गेडाम, व्ही. डब्ल्यू. खाडे यांनी  मार्गदर्शन केले.
     शाळेने याआधीही राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली असून, विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनांची जडणघडण करण्यासाठी शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे.
    या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतिभा जिवतोडे, सचिव डॉ. अशोकभाऊ जिवतोडे,  गटशिक्षणाधिकारी एस. जे. मालवी, शाळेच्या मुख्याध्यापिका सी. व्ही. धकाते तसेच शिक्षकवृंद व  पालकांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page